ती फिलिंग लय ‘रावस’ होती… घरातून पळून जावसंही वाटलं; बिग बॉस विजेता स्टॅनची पहिली प्रतिक्रिया

एमसी स्टॅन हा पुण्यातील रहिवासी आहे. तो एका वस्तीत राहतो. त्याची लाईफ अत्यंत साधी आहे. तो रॅपर आहे. त्याच्या गाण्यामुळे वादही निर्माण झाले आहेत.

ती फिलिंग लय 'रावस' होती... घरातून पळून जावसंही वाटलं; बिग बॉस विजेता स्टॅनची पहिली प्रतिक्रिया
m c stan Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 10:18 AM

मुंबई: बस्ती की हस्ती, रॅपर आणि आता बिग बॉसचा विजेता असा नावलौकीक एमसी स्टॅनने मिळवला आहे. बिग बॉसचा विजेता झाल्याने तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. शाळेचा अभ्यास करण्याऐवजी गाणी म्हणायचा म्हणून त्याला घरचे टोमणे मारायचे. पण काल त्याने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विजेता म्हणून स्टॅनचं नाव जाहीर होताच त्याच्या वडिलांनी हात उंचावून टाळ्या वाजवल्या. वडिलांना टाळ्या वाजवताना पाहून स्टॅनलाही गलबलून आलं. या क्षणाविषयी बोलताना स्टॅन म्हणतो, ती फिलिंग लय रावस होती.

एमसी स्टॅनला बिग बॉस सीजन 16चा विजेता घोषित करण्यात आलं आहे. या पुरस्कार जिंकल्यानंतर त्याने टीव्ही9शी संवाद साधला. त्याने पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्याने बिग बॉसच्या घरातील पहिल्या दिवसाच्या अनुभवापासून ते विजयी झाल्याच्या क्षणापर्यंतच्या घटनांना उजाळा दिला. हा उजाळा देताना त्याला भरभरून व्होटिंग करणाऱ्या प्रेक्षकांचेही त्यांने मनापासून आभार मानले.

हे सुद्धा वाचा

ती माझी कट्टर पब्लिक

ज्यांनी सर्वांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचे धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांचा माझ्यावर हक्क आहे. ती माझी कट्टर पब्लिक आहे. सर्व माझ्याशी कनेक्ट झाले, त्यामुळेच मी विजयी होऊ शकलो. आज जो काही आहे, त्यांच्यामुळेच आहे, असं स्टॅन म्हणाला.

घरचे लोक साधे सिंपल

विजेता म्हणून माझं नाव पुकारण्यात आलं. तेव्हा माझे वडील समोर बसलेले होते. मी विजेता घोषित करताच त्यांनी टाळ्या वाजवल्या. काय सांगू तुम्हाला वडिलांनी टाळ्या वाजवल्या. ती फिलंग फार रावस होती, असं सांगतानाच माझ्या घरचे लोक साधे सिंपल आहेत. त्यांना माझ्यावर अभिमान आहे, असं स्टॅनने सांगितलं. हे सांगताना तो भावूक झाला होता.

खूप काही शिकलो

मला वाटलं नव्हतं मी विजेता होईल. पण सलमान खान यांनी माझा हात उंचावला तेव्हा शॉक लागला. मला वाटलं मस्करी सुरू आहे. पण हा आश्चर्याचा धक्का होता. सलमान खानने मस्करी केली असं वाटलं. पण मी विजेता झालो होतो, असं तो म्हणाला.

पळून जावसं वाटलं

बिग बॉसच्या घरातील अनुभव चांगला होता. सलमान खान सर्वांना समजावतात. मलाही समजावायचे. कसं बोलायचं कसं नाही हे ही सांगितलं. मीही त्यांच्याकडून खूप काही शिकलो, असं सांगतानाच पहिल्या दिवशी बिग बॉसच्या घरातून पळायचं मन झालं होतं. मी प्रयत्न केला होता.

पहिल्या दिवशी सर्व डान्स करत होते. मी शिवला म्हटलं ब्रो बिग बॉसच्या घरात नाचायचं असा काही नियम आहे का? त्यावर तो नाही म्हणाला. पण त्या घरात सगळे रोज सकाळी नाचायचे, असंही त्यांने सांगितलं.

80 हजाराचे बूट

एमसी स्टॅन हा पुण्यातील रहिवासी आहे. तो एका वस्तीत राहतो. त्याची लाईफ अत्यंत साधी आहे. तो रॅपर आहे. त्याच्या गाण्यामुळे वादही निर्माण झाले आहेत. बिग बॉसच्या घरात त्याची चैन आणि ड्रेसिंग सेन्समुळे सर्वांचं लक्ष आपल्याकडे खेचलं.

मात्र, साधी राहणी असली तरी बिग बॉसच्या घरात त्याची खूप चर्चा झाली. स्टॅनचे 80 हजाराचे बुट आणि चैनची खूप चर्चा झाली. सलमान खाननेही त्याचे बूट आणि चैनचा अनेकदा उल्लेख केला होता.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.