साजिद खानने केली मोठी घोषणा, आशिकी 4 मध्ये प्रियंका चाैधरी आणि अंकित गुप्ता करणार रोमान्स?
बिग बाॅस 16 ने टीआरपीमध्ये धमाल केली. बिग बाॅस 16 ची फिनाले होऊन आता बरेच दिवस झाले असतानाही बिग बाॅस 16 मधील स्पर्धेक चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे याने बिग बाॅस 16 च्या घरातील सदस्यांसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये सर्वजण धमाक करताना दिसले.
मुंबई : बिग बाॅस 16 ने टीआरपीमध्ये धमाल केली. या सीजनला चाहत्यांचे प्रचंड असे प्रेम मिळाले आहे. बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) मध्ये खरी मैत्री ही बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाली. अब्दू रोजिक हा बिग बाॅस 16 मधून ज्यावेळी बाहेर पडत होता, त्यावेळी बिग बाॅस 16 मधील जवळपास सर्वच सदस्य ढसाढसा रडताना दिसले. सर्वांनाच शिव ठाकरे (Shiv Thakare) किंवा प्रियांका चाैधरी यांच्यापैकी एकजण हा बिग बाॅस 16 चा विजेता होईल, असे वाटत होते. मात्र, सर्वांनाच मोठा धक्का देत एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला. बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात तब्बल साडेचार महिने राहून आपला एक वेगळा अंदाज एमसी स्टॅन याने दाखवला.
बिग बाॅस 16 च्या घरामध्ये म्हणावे तेवढे जास्त भांडणे देखील एमसी स्टॅन याने केले नाहीत. बऱ्याच वेळा टास्क खेळताना देखील एमसी स्टॅन दिसला नाही. जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग घेऊन एमसी स्टॅन हा बिग बाॅसच्या घरात दाखल झाला होता. एमसी स्टॅन याचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना आवडला. मात्र, एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला.
शिव ठाकरे, एमसी स्टॅन, अब्दू रोजिक, साजिद खान, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांची खास मैत्री ही बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाली. विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरात शेवटपर्यंत यांची मैत्री कायम होती. यासोबतच साजिद खान यांची मैत्री ही अंकित गुप्ता याच्यासोबत देखील होती. नुकताच साजिद खान, अंकित गुप्ता आणि प्रियंका चाैधरी हे सोबत स्पाॅट झाले.
यावेळी साजिद खान याने एका प्रश्नाचे उत्तर देत जाहिर केली की, प्रियंका चाैधरी आणि अंकित गुप्ता यांच्यासोबत मिळून मी आशिकी 4 चित्रपटाची निर्मिती करणार आहे. साजिद खान याचे हे बोलने ऐकून चाहते आनंदी झाले आहेत. मात्र, नंतर कळाले की, साजिद खान हा मजाकमध्ये बोलला आहे.
एमसी स्टॅन याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे. बिग बाॅस 16 मधून बाहेर पडल्यानंतर अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये मोठे वाद झाले. अब्दू रोजिक याने एमसी स्टॅन याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.