आधी मारहाणीचा आरोप, मग घटस्फोट, आता स्नेहा वाघ पूर्वपतीला म्हणतेय ‘मला तुझ्या लग्नाला बोलव!’

'बिग बॉस मराठी 3’च्या (Bigg Boss Marathi 3) पहिल्याच दिवशी जेव्हा अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) आणि तिचा माजी पती आविष्कार दारव्हेकर (Avishkar Darvhekar) यांची एण्ट्री झाली तेव्हा सगळेच प्रेक्षक अवाक् झाले.

आधी मारहाणीचा आरोप, मग घटस्फोट, आता स्नेहा वाघ पूर्वपतीला म्हणतेय ‘मला तुझ्या लग्नाला बोलव!’
Sneha-Avishkar
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 2:08 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. ‘बिग बॉस मराठी 3’च्या (Bigg Boss Marathi 3) पहिल्याच दिवशी जेव्हा अभिनेत्री स्नेहा वाघ (Sneha Wagh) आणि तिचा माजी पती आविष्कार दारव्हेकर (Avishkar Darvhekar) यांची एण्ट्री झाली तेव्हा सगळेच प्रेक्षक अवाक् झाले. दोघांच्या समोरासमोर येण्याने ते स्वतः देखील काहीसे गोंधळलेच होते. आता या घरात काही तरी वेगळं पाहायला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

अपेक्षेप्रमाणे या घरात बऱ्याच गोष्टी पाहायला मिळाल्या. बऱ्याचदा स्नेहा पूर्वग्रह ठेवून खेळताना दिसली. अनेकदा तिने आविष्कारला नॉमिनेट केले होते. मात्र, काही काळानंतर या दोघांच्या दरम्यान काही गोष्टी मैत्रीपूर्ण झालेल्या दिसल्या. नुकतेच घरात नॉमिनेशन पार पडले. यात, आविष्कार दारव्हेकर याला घराबाहेर जावे लागले. यावेळी घरातून बाहेर जाताना स्नेहाने आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीला अर्थात आविष्कार दारव्हेकर याला ‘तुझ्या लग्नाला मला नक्की बोलावं, मी नक्की येईन’, असे म्हटले.

आविष्कार दारव्हेकर ‘बिग बॉस’च्या घराबाहेर!

नुकतेच ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात एलिमिनेशन पार पडले. यात स्नेहा, आविष्कार आणि सोनाली हे तिघे एलिमिनेशनमध्ये होते. या वेळी सोनाली अजून सुरक्षित असल्याचे महेश मांजरेकर यांनी सांगितले. यानंतर स्नेहा आणि आविष्कार या दोघांपैकी एक या घराबाहेर जाणार हे निश्चित झाले होते. यानंतर स्नेहा सेफ असल्याचे म्हणत आविष्कारचा प्रवास इथेच थांबत असल्याचे जाहीर झाले. इतर एलिमिनेट स्पर्धकांप्रमाणेच आविष्कारनेही आपले सामान आवरले आणि आपल्या नावाची पाटी घेऊन तो मुख्य दाराच्या दिशेने रवाना झाला.

यावेळी त्याने एकदा सगळ्या सहस्पर्धकांची गळाभेट घेतली. यावेळी दाराबाहेर जाताना स्नेहाने देखील आपल्या मनातील भावना आविष्कारला सांगितल्या. ती म्हणाली की, ‘ज्या दिवशी तुला या घरात मी पाहिलं तेव्हा मी खूप घाबरले, गोंधळले. पण, नंतर आपल्यात काही गोष्टी नीट झाल्या. त्या पुढे बाहेरही तशाच असतील. आणि तुझ्या लग्नाला मला बोलव, मी नक्की येईन.’

आविष्कारवर मारहाणीचा आरोप

स्नेहाचे पहिले लग्न अविष्कर दारवेकर यांच्याशी झाले होते. त्यावेळी ती फक्त 19 वर्षांची होती. पहिल्या लग्नात तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले, असे स्नेहा सांगते. त्यानंतर तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला. यावेळी आपली आपबिती सांगताना स्नेहा म्हणाली की, ‘एक वेळ अशी होती की, मला घरी जायची देखील भीती वाटायची.. शूटवर जाताना देखील माझी अर्धी शुद्ध हरपलेली असायची. अशावेळी सेटवरचे लोक मला खूप सांभाळून घायायचे. अनेकदा शूट करतानासुद्धा मला मारहाण झालेल्या खुणा सर्वांना दिसायच्या…’.

मात्र, आविष्कारने कोणतेही आरोप न करता किंवा स्पष्टीकरण न देता स्नेहाचे कौतुक केले. ती खूप खंबीर आहे, कोणाचाही आधार न घेता ती आजवर इथपर्यंत पोहोचली, असे म्हणत त्याने तिचे कौतुक केले होते.

हेही वाचा :

Abhishek-Aishwarya Love Story | चित्रपटात काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले, वाचा कशी होती अभिषेक-ऐश्वर्याची प्रेमकथा…

Ankita Lokhande | लगीनं घटीका समीप आली, करा हो लगीन घाई! अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.