Tunisha Sharma Death | तुनिशा शर्मा हिच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी फॉरेन्सिक टीम मालिकेच्या सेटवर

आता शीजान खान हा कोठडीत असून पोलिस तुनिशा हिच्या आत्महत्येप्रकरणी त्याची कसून चाैकशी करत आहेत.

Tunisha Sharma Death | तुनिशा शर्मा हिच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी फॉरेन्सिक टीम मालिकेच्या सेटवर
Tunisha Sharma
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 4:24 PM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर दररोज अनेक खुलासे होत आहेत. तुनिशाच्या आईने शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. FIR नोंदवल्यानंतर पोलिसांनी शीजान खान याला अटक करत न्यायालयात हजर केले आणि त्याला चार दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली. आता शीजान खान हा कोठडीत असून पोलिस तुनिशा हिच्या आत्महत्येप्रकरणी त्याची कसून चाैकशी करत आहेत. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

दास्तान-ए-काबुल या मालिकेमध्ये तुनिशा आणि शीजान हे दोघेही मुख्य भूमिकेमध्ये होते. शीजान आणि तुनिशा हे रिलेशनशिपमध्ये देखील होते. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वीच या दोघांचे ब्रेकअप देखील झाले होते.

शीजानसोबत ब्रेकअप झाल्यामुळेच तुनिशा ही तणावामध्ये होती. तुनिशा हिने दास्तान-ए-काबुल मालिकेच्या सेटवरील शीजानच्या मेकअप रूममध्येच गळफास देत आपली जीवनयात्रा संपवली.

तुनिशाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी शीजानचा फोन ताब्यात घेतला आहे. आता दास्तान-ए-काबुल मालिकेच्या सेटवर फॉरेन्सिक टीम पोहचली. यावेळी गळफास घेण्यासाठी तुनिशाने वापरलेल्या दोरीला रक्ताचे डाग आढळून आले आहेत.

फॉरेन्सिक टीमने तुनिशाचे कानातले, कपडे आणि अजून काही साहित्य जप्त केले आहे. तुनिशाला धोका मिळाल्यामुळेच ती तणावात असल्याचे तिच्या काकांनी सांगितले होते. आता या प्रकरणात अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.