Bigg Boss 15 Shocking | बिग बॉसच्या घरातून धक्कादायक एक्सिट, उमर रियाझ शोमधून बाहेर, रश्मी देसाईला आश्रू अनावर

बिग बॉस 15 चा फिनाले जवळ आल्यानंतर उमर रियाझ शोमधून बाहेर पडला आहे. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. उमर रियाझ बिग बॉस 15 चा प्रबळ दावेदार होता. तसेच टिव्ही इंडस्ट्रीमधील अनेक नामवंत कलाकार उमर रियाझच्या सपोर्टसाठी मैदानामध्ये देखील उतरले होते.

Bigg Boss 15 Shocking | बिग बॉसच्या घरातून धक्कादायक एक्सिट, उमर रियाझ शोमधून बाहेर, रश्मी देसाईला आश्रू अनावर
उमर रियाझ
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 8:35 AM

मुंबई : बिग बॉस 15 (Bigg Boss 15) चा फिनाले जवळ आल्यानंतर उमर रियाझ (Omar Riaz) शोमधून बाहेर पडला आहे. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. उमर रियाझ बिग बॉस 15 चा प्रबळ दावेदार होता. तसेच टिव्ही इंडस्ट्रीमधील अनेक नामवंत कलाकार उमर रियाझच्या सपोर्टसाठी मैदानामध्ये देखील उतरले होते. मात्र, घरामध्ये घडलेल्या एका घटनेनंतर उमर रियाझला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

रश्मी देसाई आणि करण कुंद्रा यांना मोठा धक्का

‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान उमर रियाजला बोलला की, तू कधीच काही ऐकत नाहीस. वारंवार सांगूनही तू हिंसा केलीस. या अगोदर ही तू बऱ्याच वेळा घरामध्ये हिंसा केलीस. मात्र, त्यावेळी तुला माफ केले. मात्र, यावेळी तू केलेल्या हिंसेवर जनतेने निकाल दिला आहे. उमरशी बोलल्यानंतर सलमानने उमर रियाझला ‘बिग बॉस’मधून बाहेर काढल्याची घोषणा केली.

गीता कपूर यांनीही प्रश्न उपस्थित केला

बिग बॉसच्या पॅनल डिस्कशनमध्ये निशांतच्या समर्थनार्थ आलेल्या कोरिओग्राफर गीता कपूरने उमरच्या मनोवृत्तीवर काही प्रश्न उपस्थित केले. गिता कपूर म्हणाली की, उमर, तू डॉक्टर आहेस, पण या बिग बॉसच्या घरात तू ज्या पद्धतीने वागला आहेस. त्यामुळे मी माझ्या उपचारांसाठी तुझ्याकडे कधीच येणार नाही. कारण बिग बॉस हा एक पर्सनॅलिटी शो आहे आणि जर तुमची व्यक्तिरेखा अशी या शोमध्ये दिसली तर रुग्ण अशा डॉक्टरांकडे जाण्यास नक्कीच घाबरतील.

चाहतेही संतापले!

उमर रियाझचे चाहते ट्विटरवर चांगलेच संतापलेले दिसत आहेत. ‘नो उमर रियाझ नो BB15’ ट्रेंडिंग होत आहे. चाहते उमरच्या समर्थनात आहेत आणि त्याच्या एलिमिनेशनच्या विरोधात ट्विट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘बिग बॉस तुमच्यासारख्या सुंदर मनाच्या व्यक्तीसाठी नव्हते. बॉयकॉट BB15’

संबंधित बातम्या : 

Happy Birthday Kalki Kochlin : वयाच्या 27 व्या वर्षी लग्न, दोन वर्षांत घटस्फोट; कल्कीबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

कटप्पाला कोरोनाची लागण; सत्यराज उपचारासाठी रुग्णालयात दाखल

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.