Devmanus | ‘देवमाणूस’च्या अजित कुमारचं काम वाढलं म्हणून बज्याने आणला नवा असिस्टंट, पाहा कलाकारांचा धमाल व्हिडीओ

‘देवमाणूस’ (Devmanus) ही मराठी मालिका सध्या छोट्या पाड्यावर जोरदार सुरु असून, प्रेक्षकांनी या मालिकेला आणि यातील पात्रांना अक्षरश: डोक्यावर घेतले आहे.

Devmanus | ‘देवमाणूस’च्या अजित कुमारचं काम वाढलं म्हणून बज्याने आणला नवा असिस्टंट, पाहा कलाकारांचा धमाल व्हिडीओ
देवमाणूस
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 2:59 PM

मुंबई : ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मराठी मालिका सध्या छोट्या पाड्यावर जोरदार सुरु असून, प्रेक्षकांनी या मालिकेला आणि यातील पात्रांना अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. या मलिकेतील ‘देवीसिंग’, ‘डिम्पल’, ‘बज्या’, ‘सरू आजी’ हि आणि इतर पात्र देखील गाजत आहेत. मालिकेत या पात्रांची जितकी ऑन स्क्रीन केमिस्ट्री दिसते, तितकीच ती ऑफ स्क्रीन देखील धमाल करताना दिसते. सोशल मीडियावर या कलाकारांचा कल्ला दिसत आहे.

मालिकेतील कलाकारांचे सोशल मीडियावर रील्स खूप व्हायरल होत असतात. अभिनेता किरण गायकवाड या मालिकेत मुख्य भूमिका साकारात आहे. नुकताच किरण गायकवाड याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ‘बज्या’ आणि ‘डॉ. अजित कुमार देव’ धमाल करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

या व्हिडीओमध्ये बज्या डॉक्टरांना सांगत आहे की, डॉक्टर तुमच्यावर खूप ताण पडतोय, तुम्हाला एका नवीन असिस्टंटची गरज आहे. यावर डॉक्टर महतो, कशाला काय गरज आहे? यावर बज्या उत्तर देतो की, असिस्टंट बाई आहेत. त्यावर डॉक्टर खूप खुश झालेला दिसत आहे. तर डॉक्टरच्या एका बाजूला ‘चंदा’ अर्थात माधुरी पवार दिसत आहे.

‘आर्या’ने घेतला प्रेक्षकांचा निरोप

‘देवमाणूस’ ही मालिका सध्या एका थरारक वळणावर आली आहे. देवीसिंगचे काळे कारनामे जगाच्या समोर आणण्यासाठी एसीपी दिव्या सिंगला एका नव्या मैत्रिणीची साथ मिळाली होती. ही मैत्रीण होती तिची केस लढणारी वकील आर्या देशमुख. मालिकेत देवीसिंगला तुरुगांत धाडण्यासाठी सरकारी वकिल म्हणून आर्या देशमुख हिची मालिकेत एंट्री झाली होती. ‘वैजू नं 1’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनाली पाटील हिने ‘देवमाणूस’ या मालिकेत आर्याची भूमिका साकारली होती.

मात्र, आता देवीसिंग ऊर्फ डॉ.अजित कुमार देव हा निर्दोष सिद्ध होऊन मुक्त झाल्याने आर्याची यातील भूमिका तूर्तास तरी संपली आहे. यामुळे मालिकेत ‘आर्या’ या पात्राने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र,काहीच भागांसाठी आलेली ‘आर्या’ प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान निर्माण करून गेली. त्यामुळे आता प्रेक्षक देखील या पात्राला खूप मिस करत आहेत. याचा बरोबर हे पात्र साकारणाऱ्या सोनालीला देखील चाहते मिस करत आहेत.

‘चंदा’ची एन्ट्री

भल्याभल्यांना मृत्युच्या दारात ढकलणारा देवीसिंग ऊर्फ दो. अजित कुमार देव आता चांगलाच अडकणार आहे. चंदाला लग्नाचं आमिष दाखवून, तिच्याकडून पैसे घेऊन फरार झालेला देवीसिंग अखेर आता चंदाच्या हाती लागला आहे. देवीसिंगने फसवल्यामुळे नको असूनही दारूच्या धंद्यात फसलेली चंदा आता देवीसिंगचा बदला घेणार आहे. डॉ. अजित कुमार देवच देवीसिंग असल्याचा पुरावा चंदाकडे असल्याने, एरव्ही इतरांवर हुकुम गाजवणारा देवीसिंग आता चक्क चंदाच्या तालावर नाचणार आहे.

(Funny Video of Devmanus Fame Kiran Gaikwad And Kiran Dhange)

हेही वाचा :

‘इंदिरा गांधीं’च्या भूमिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का? नेटकरी करतायत मेकअप आर्टिस्टचं कौतुक!

‘सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे…’ नाकात नथ, हिरवी साडी, निरागस डोळे; अशी ‘संस्कृती’ पाहिलीय का?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.