गोव्यात मालिकांचं शूटिंग बंद, मुख्यमंत्र्यांचा निर्णय, ‘सूर नवा..’, ‘अग्गंबाई सूनबाई’सह अनेक मालिका अडचणीत
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागल्याने सध्या अनेक मालिकांचे चित्रीकरण गोव्यासह आसपासच्या राज्यात हलवण्यात आले होते. (Goa TV Serial shooting)
पणजी : गोव्यात स्थलांतरित करण्यात आलेले मराठी मालिकांच्या चित्रिकरणावर गदा आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांनी वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे. सूर नवा ध्यास नवा, रंग माझा वेगळा, तू सौभाग्यवती हो, पाहिले ना मी तुला, अग्गंबाई सूनबाई, सुख म्हणजे नक्की काय असतं यासारख्या मालिकांचं सध्या गोव्यात शूटिंग सुरु होतं. मात्र दहा मेपर्यंत या मालिकांचं शूटिंग स्थगित झालं आहे. (Goa CM Pramod Sawant announces no TV Serial shooting in state ahead of Corona Lockdown in Goa)
गोव्यात कोरोनाचा कहर
गोव्यातही कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी गोवा सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे, पण या लॉकडाऊनमध्येही पर्यटकांची येणे-जाणे सुरु असून कोणत्याही कडक निर्बंधाशिवाय टीव्ही मालिकांचे शूटिंग सुरु झाले आहे. म्हणूनच गोव्यातील स्थानिकांचे बरेच हाल होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन केवळ सर्वसामान्यांसाठी आहे का? असा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित केला जात आहे.
मराठी-हिंदी मालिकांचं शूटिंग
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागल्याने सध्या अनेक मालिकांचे चित्रीकरण गोव्यासह आसपासच्या राज्यात हलवण्यात आले होते. गोव्यात 30 हून अधिक ठिकाणी मालिका-सिनेमांचं शूटिंग सुरु आहे. सूर नवा ध्यास नवा, रंग माझा वेगळा, तू सौभाग्यवती हो, पाहिले ना मी तुला, अग्गंबाई सूनबाई, सुख म्हणजे नक्की काय असतं यासारख्या मराठी मालिकांसोबत कुंडली भाग्य, गुम है किसी के प्यार में, आपकी नजरों ने समझा, ये है चाहतें, अपना टाइम भी आएगा या हिंदी मालिकांचं शूटिंग सुरु आहे. आता मालिकांचे निर्माते काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
‘सूर नवा ध्यास नवा’च्या सेटवर राडा
अलिकडेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी ‘सूर नवा ध्यास नवा’ (Sur Nava Dhyas Nava) या कलर्स मराठी वाहिनीवरील सिंगिं रिअॅलिटी शोचे शूटिंग थांबवले होते. विजय सरदेसाई यांनी गोव्यातील फातोर्डा भागातील रवींद्र भवन येथील चित्रिकरणस्थळी भेट दिली होती. विजय सरदेसाई यांनी कॅमेर्यासह स्टुडिओच्या आत जाऊन तिथली परिस्थिती दाखवली होती. या शूटिंगदरम्यान कोणीही सामाजिक अंतराचे नियम पाळत नाही आणि कोणीही मास्क देखील लावलेला नाही, असे त्यांनी सांगितले होते.
WHO GAINS WHEN FATORDA LOSES? https://t.co/yYXxEXP3Ga Ravindra Bhavan permission for Film Shootings with people not following social distancing & other CovidSOPs needs to be probed! How District Adminstration & Police, enforcing restriction guidelines, ignored these violations?
— Vijai Sardesai (@VijaiSardesai) May 5, 2021
(Goa CM Pramod Sawant announces no TV Serial shooting in state ahead of Corona Lockdown in Goa)
अवधूत गुप्तेंचा समजवण्याचा प्रयत्न
‘सूर नाव ध्यास नवा’ या रिअॅलिटी शोचे निर्माते-परीक्षक आणि प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी समजावल्यानंतरही विजय सरदेसाई मागे हटले नाहीत. अवधूत गुप्ते आणि सेटवरील उपस्थित कर्मचार्यांनी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की, हे सर्व जण कोरोना टेस्ट करुन गोव्यात आले होते आणि बायो बबलमध्ये शूट करत आहेत. पण तरीही त्यांच्या समजवण्याचा काहीही परिणाम झाला नाही.
संबंधित बातम्या :
गोवा फॉरवर्ड पार्टी आक्रमक, ‘सूर नवा ध्यास नवा’चे गोव्यातील चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न!
आदेश भाऊजींचे पुन्हा Work From Home, देवमाणूस बेळगावात, झी मराठीच्या मालिकांचं शूट कुठे?
(Goa CM Pramod Sawant announces no TV Serial shooting in state ahead of Corona Lockdown in Goa)