Happy Birthday Bharti Singh | ज्या लेकीच्या जन्मामुळे नाराज झालं कुटुंब, तिनेच उंचावलं कुटुंबाचं नाव, जाणून घ्या कॉमेडियन भारती सिंहची कहाणी

भारती सिंहला तिच्या वजनामुळे बरेच काही ऐकावे लागले होते. परंतु, तिने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि आपल्या कलेमुळे ती प्रत्येक घरात ओळखली जाऊ लागली. भारती ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय महिला कॉमेडियन आहे.

Happy Birthday Bharti Singh | ज्या लेकीच्या जन्मामुळे नाराज झालं कुटुंब, तिनेच उंचावलं कुटुंबाचं नाव, जाणून घ्या कॉमेडियन भारती सिंहची कहाणी
भारती सिंह
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 10:28 AM

मुंबई : बरेचदा लोक जेव्हा एखाद्याबद्दल चर्चा करतात, तेव्हा ते फक्त वरवरच्या सौंदर्याबद्दलच बोलतात. पण जेव्हा अंतर्गत सौंदर्याची चर्चा होते, तेव्हा टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील एका नटखट मुलीचा चेहरा समोर येतो. ही ती मुलगी आहे, जी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पंजाबमधील अमृतसरहून मुंबईला आली होती. अनोळखी शहरात येऊन तिने इंडस्ट्रीत अशी ओळख निर्माण केली की, या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आदर्श बनली. आपण आज कॉमेडियन भारती सिंहबद्दल (Bharti Singh) बोलत आहोत (Happy Birthday Bharti Singh know about actress life story).

भारती सिंहला तिच्या वजनामुळे बरेच काही ऐकावे लागले होते. परंतु, तिने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि आपल्या कलेमुळे ती प्रत्येक घरात ओळखली जाऊ लागली. भारती ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय महिला कॉमेडियन आहे. कॉमेडी क्वीन भारती आज (3 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. भारती सिंह यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्ही यापूर्वी कधीच ऐकले नसेल.

भारतीच्या आईला अजूनही ‘त्या’ गोष्टीची खंत

भारती सिंहचा जन्म 3 जुलै 1985 रोजी अमृतसर येथे झाला होता. एका मुलाखतीत भारती सिंहने सांगितले होते की, माझ्या कुटुंबातील सदस्यांना कदाचित माझा जन्मच होऊ नये, असे वाटत होते. त्यावेळी ‘हम दो हमारा दो’ असा नारा होता. माझ्या अगोदर माझी भावंडं होती आणि मी आई-वडिलांची तिसरी अपत्य होते. माझी आई मला अजूनही सांगते की ‘मला तुला जन्म द्य्द्यचा नव्हता, कारण दोन मुलांची जबाबदारी खूप होती. ‘ भारती पोटात असताना तिच्या आईने बरीच औषधे खाल्ली, अनेक उपाय केले. पण, ती भरतीचा जन्म टाळू शाली नाही. याबद्दल बोलताना भारती म्हणते, ‘आजही मला एखादा पुरस्कार मिळाला किंवा मी टीव्हीवर आले तर माझी आई मला सांगते की, मी एक पापातून वाचले आहे. तिच्या आईला आजही या गोष्टीची खंत वाटते.

अभिनेत्री नसती तर ‘या’ क्षेत्रात चमकली असती!

भारती सिंह म्हणते की, ‘माझे सर्व शिक्षण अमृतसरमधूनच झाले आहे. मला स्वत:लासुद्धा माहित नाही की, मी या क्षेत्रात कशी आले. सुरुवातीपासून मी क्रीडा विश्वात सक्रिय होते. मी राष्ट्रीय रायफल नेमबाज आणि आर्चर आहे. जेव्हा महाविद्यालयात होते, तेव्हा एनसीसीदेखील जॉईन केलं होतं. एक दिवस एक मॅडम म्हणाल्या आमच्या कॉलेजमध्ये ये. मात्र, त्या कॉलेजची फी ऐकून मी त्यांना थेट नकार दिला होता. मात्र, त्या म्हणाल्या  तू तुझे सर्टिफिकेट्स आणलेस तर, तुला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फ्री सिखन ऐकून मी देखील खुश झाले होते आणि त्याच महाविद्यालयामुळे मी क्रीडा क्षेत्रात सक्रिय झाले होते.’

(Happy Birthday Bharti Singh know about actress life story)

हेही वाचा :

Photo : सारा अली खानचं वर्कआऊट सेशन, लेव्हल अप म्हणत फोटो आणि व्हिडीओ शेअर

PHOTO | मंदिरा-राजचा मढस्थित ‘पूल साईड’ बंगला दिला जातोय भाडेतत्वावर, जाणून घ्या एका दिवसाचे भाडे किती?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.