Happy Birthday Mona Singh | ‘जस्सी जैसी कोई नही’ म्हणत घराघरांत मिळवली ओळख, वाचा अभिनेत्री मोना सिंहबद्दल
मोना सिंहने 2003 मध्ये टीव्ही सीरियल ‘जस्सी जैसी कोई नही’ मालिकेपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या वेळी जेव्हा शोमध्ये सुना महागड्या साड्या परिधान करून प्रेक्षकांचे मनोरंजन करायच्या, तेव्हा मोना सिंह मोठा आणि चौकोनी चष्मा, ब्रेसेस आणि विचित्र केशरचना करून जस्सी बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती.
मुंबई : आज (8 ऑक्टोबर) प्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंहचा (Mona Singh) वाढदिवस आहे आणि ती 40 वर्षांची झाली आहे. मोनाचा जन्म 8 ऑक्टोबर 1981 रोजी चंदीगडमधील एका शीख कुटुंबात झाला. मोनाने ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’, ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘प्यार को हो जाने दो’, ‘कवच: काली शक्तियों से’, ‘कहने को हमसफर हैं’, ‘ये मेरी फॅमिली’ अशा अनेक प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये काम केले.
मोना सिंहने 2003 मध्ये टीव्ही सीरियल ‘जस्सी जैसी कोई नही’ मालिकेपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या वेळी जेव्हा शोमध्ये सुना महागड्या साड्या परिधान करून प्रेक्षकांचे मनोरंजन करायच्या, तेव्हा मोना सिंह मोठा आणि चौकोनी चष्मा, ब्रेसेस आणि विचित्र केशरचना करून जस्सी बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना सास-बहू शोमधून ब्रेक मिळाला आणि याच कारणामुळे शोच्या सुरुवातीच्या भागांना प्रचंड टीआरपी मिळाला.
‘जस्सी’चा खरा चेहरा पाहण्यासाठी प्रेक्षक झाले होते आतुर
जस्सीच्या लूकमुळे मोनाची खरी ओळखही बराच काळ लपून राहिली होती. प्रेक्षकांना मोनाचा खरा चेहरा पाहण्याची तआतुरता होती आणि जेव्हा तिचा खरा चेहरा पहिल्यांदा दिसला तेव्हा प्रेक्षकांचा विश्वास बसत नव्हता की टीव्हीवर जस्सी बनलेली मोना सिंह वास्तविक जीवनात किती सुंदर आहे. ती शोमध्ये अभिनेता अपूर्व अग्निहोत्रीच्या विरुद्ध होती, प्रेक्षकांना दोघांची जोडी खूप आवडली होती.
चित्रपटांमध्ये आजमावले नशीब
मोना सिंहने छोट्या पडद्यावर आपली छाप पाडली होती आणि तिला मोठ्या पडद्यावर काम करायचे होते. मोनाने चित्रपटांमध्येही आपले नशीब आजमावले आणि 2009 मध्ये ‘3 इडियट्स’ या चित्रपटाद्वारे ती मोठ्या पडद्याकडे वळली. आमिर खान आणि करीना कपूर खानच्या या चित्रपटात मोना करीनाच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत दिसली. यानंतर, ती ‘उड पटांग’, ‘झेड प्लस’ आणि ‘अमावस’ या चित्रपटांमध्येही दिसली. आता मोना पुन्हा एकदा आमिर आणि करीनाच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे.
वयाच्या 38व्या वर्षी बांधली लग्नगाठ
मोना सिंहने वयाच्या 38व्या वर्षी लग्न केले. तिने 27 डिसेंबर 2019 रोजी शीख रितीरिवाजानुसार दक्षिण भारतीय बँकर श्याम राजगोपालनशी लग्न केले. लग्नानंतर मोनाने सांगितले की, तिच्या आयुष्यात काय बदल झाले आहेत आणि तिचे वैवाहिक आयुष्य कसे चालले आहे. मोना म्हणाली होती, ‘मी अजूनही पूर्वीसारखीच आहे आणि लग्नाबद्दल ही सर्वात चांगली गोष्ट आहे. माझा नवरा मला माझ्यासारखा राहू देतो, तो माझ्यावर माझ्याप्रमाणेच प्रेम करतो आणि मी स्वतःला अजिबात बदलू इच्छित नाही. आम्ही एकमेकांना अधिक ओळखत आहोत. मी त्याच्यासोबत राहण्याचा आनंद घेत आहे.’
हेही वाचा :
ह्रदयस्पर्शी! आर्यनला हवं तर विसरा, पण ह्रतिक रोशनची एक पोस्ट जी प्रत्येक तरुणानं वाचावी!
यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार चिमुकली मंडळी, परी आणि स्वरामध्ये रंगणार जुगलबंदी!