नितीश भारद्वाज यांच्या स्मितहास्यावर भाळले ‘महाभारत’चे निर्माते, दिग्गजांना मागे टाकत मिळाली ‘श्रीकृष्णा’ची भूमिका!   

अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bhardwaj) यांचे नाव ऐकताच समोर येते, ती ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेमधील ‘श्रीकृष्ण’ ही व्यक्तिरेखा. बीआर चोप्रा (B R chopra) यांच्या या शोमधून नितीश भारद्वाज यांना बरीच प्रसिद्धी मिळाली.

नितीश भारद्वाज यांच्या स्मितहास्यावर भाळले ‘महाभारत’चे निर्माते, दिग्गजांना मागे टाकत मिळाली ‘श्रीकृष्णा’ची भूमिका!   
नितीश भारद्वाज
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 11:29 AM

मुंबई : अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bhardwaj) यांचे नाव ऐकताच समोर येते, ती ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेमधील ‘श्रीकृष्ण’ ही व्यक्तिरेखा. बीआर चोप्रा (B R chopra) यांच्या या शोमधून नितीश भारद्वाज यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. नितीश भारद्वाज यांनी आपल्या अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या ‘श्रीकृष्ण’ या पात्राशी संबंधित अनेक किस्सेही शेअर केले आहेत. जेव्हा ते महाभारताच्या शूटिंगनंतर किंवा ती संपल्यावर बाहेर येत असत, तेव्हा लोक त्यांना पाहिल्यावर अशा भावना व्यक्त करायचे, जणू ते खरोखरच भगवान श्री कृष्ण आहेत (Happy Birthday Nitish Bhardwaj know the behind story how actor got Krishna role in Mahabharata).

आज अभिनेते नितीश भारद्वाज यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत की, महाभारतात नितीश भारद्वाज यांना श्रीकृष्णाचे पात्र कसे मिळाले. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत नितीश यांनी एकदा सांगितले होते की, प्रत्यक्षात त्यांना श्री कृष्णाची भूमिका करण्याची इच्छा नव्हती, कारण त्यांना स्क्रीन टेस्टची भीती वाटत होती. या व्यक्तिरेखेच्या आधी त्यांना विदूरच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती.

विदुर ते श्रीकृष्ण…

याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले होते की, ‘जेव्हा मला पहिल्यांदा ‘विदूर’च्या भूमिकेसाठी निवडण्यात आले तेव्हा, मला सेठ स्टुडिओमध्ये शूट करण्यासाठी बोलवले गेले होते. मी मेकअप रूममध्ये होतो. वीरेंद्र राझदान त्यांच्या वेशभूषेत आले आणि म्हणाले की ते विदूरची व्यक्तिरेखा साकारत आहे. मी त्यांना सांगितले की, तुम्ही विदुरची भूमिका कशी करू शकता? त्यांनी या भूमिकेसाठी मला बोलावले आहे. त्यावर वीरेंद्रने मला सांगितले की, मी आता ड्रेस घातला आहे व माझा शॉट देणार आहे.’

‘त्यानंतर मी रविजींना भेटायला आत गेलो, कारण आम्हाला एकमेकांना आधीपासूनच ओळखत होतो आणि आम्ही एकत्र दोन जाहिराती केल्या होत्या. त्यांनी (रवि चोप्रा) मला जेवण संपेपर्यंत थांबण्यास सांगितले. दुपारचे जेवण झाल्यावर त्यांनी मला सांगितले की, तुम्ही 23 ते 24 वर्षांचे आहात. काही भागानंतर विदूरला वृद्ध दाखवायचे आहे. तुम्ही तितके वृद्ध दिसू शकत नाही. हे ऐकून माझ्या आशा ढासळल्या.’

यानंतर नितीश यांना पुन्हा एकदा महाभारताचा भाग होण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांना नकुल आणि सहदेवच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु अभिमन्यूच्या व्यक्तिरेखेत रस असल्यामुळे त्यांनी नकार दिला. त्यावेळी नितीश पूर्णपणे बेरोजगार नव्हते. त्या काळात ते मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम करत होते. नकुल किंवा सहदेवची भूमिका साकारण्यासाठी बी.आर.चोप्रांनी नितीश यांची खूप समजूत घातली, पण ते त्यांना मान्य नव्हते (Happy Birthday Nitish Bhardwaj know the behind story how actor got Krishna role in Mahabharata).

55 कलाकारांनी दिली स्क्रीन टेस्ट

या मालिकेचे कास्टिंगचे काम चालू होते की, त्यादरम्यान नितीश यांना ‘श्री कृष्णा’ची भूमिकाही देण्यात आली पण निर्मात्यांना यासाठी अनुभवी कलाकारांची गरज असल्याने त्यांनी नाकारले. खरं तर, नंतरच्या अहवालात, त्याने सांगितले होते की, आपल्याला स्क्रीन टेस्ट द्यायची नव्हती, म्हणून त्यांनी कृष्णाच्या भूमिकेला नकार दिला होता. नितीश यांनी नकार दिल्यानंतर सुमारे 55 कलाकारांनी स्क्रीन टेस्ट दिली. यामध्ये गजेंद्र चौहान देखील होते, ज्यांनी नंतर युधिष्ठिरची भूमिका केली होती. श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी गजेंद्रशिवाय ऋषभ शुक्ला यांनीही स्क्रीन टेस्ट दिली, परंतु त्यांचीही निवड झाली नाही. मात्र, त्यांना शंतनूची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

या भूमिकेसाठी कोणीही सुयोग्य कलाकार सापडत नव्हता, तेव्हा रवि चोप्राने पुन्हा नितीश भारद्वाज यांच्याकडे संपर्क साधला आणि एकदा स्क्रीन चाचणी देण्यास सांगितले. त्याने नितीशला सांगितले की, जर तुम्हाला चांगले पात्र हवे असेल, तर तुम्हाला एकदा स्क्रीन टेस्ट द्यावी लागेल. यानंतर नितीश यांनी स्क्रीन टेस्ट दिली आणि त्यांना श्री कृष्णाची भूमिका मिळाली. खरं तर, ही भूमिका त्यांना मिळाली कारण रवी चोप्रा त्यांच्या स्मितहास्याने प्रभावित झाले होते. रवी चोप्रा यांना वाटले की, हे त्यांचे हसू श्रीकृष्णाची भूमिका साकारणार्‍या व्यक्तीला शोभून दिसेल.

(Happy Birthday Nitish Bhardwaj know the behind story how actor got Krishna role in Mahabharata)

हेही वाचा :

Happy Birthday Mani Ratnam | चित्रपटांचे जादुगार ‘मणिरत्नम’, जाणून घ्या त्यांच्या ‘या’ सदाबहार कलाकृतींबद्दल…

Breakup Story | लग्नापर्यंत पोहोचलं होतं राणी-अभिषेकचं नातं, चित्रपटातला ‘तो’ सीन ठरला ब्रेकअपचं कारण!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.