Happy Birthday Shilpa Shirodkar | 90च्या दशकांत बोल्ड सीन देऊन मिळवली प्रसिद्धी, लग्नानंतर लंडनमध्ये स्थायिक झाली शिल्पा शिरोडकर!

अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) ही 90च्या दशकातील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. 20 नोव्हेंबर 1969 रोजी जन्मलेल्या शिल्पाने वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली.

Happy Birthday Shilpa Shirodkar | 90च्या दशकांत बोल्ड सीन देऊन मिळवली प्रसिद्धी, लग्नानंतर लंडनमध्ये स्थायिक झाली शिल्पा शिरोडकर!
Shilpa Shirodkar
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 8:00 AM

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) ही 90च्या दशकातील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. 20 नोव्हेंबर 1969 रोजी जन्मलेल्या शिल्पाने वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली. शिल्पाला अभिनयाचा वारसा कुटुंबातूनच मिळाला आहे. तिची आई गंगूबाई या मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, तर आजी मीनाक्षी शिरोडकर देखील अभिनेत्री होत्या.

1989 मध्ये ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटातून शिल्पाने तिच्या करिअरला सुरुवात केली. यात तिच्या सोबत अभिनेता मिथुन चक्रवर्ती होते. 1990 मध्ये आलेल्या ‘किशन कन्हैया’ या चित्रपटातून शिल्पाला खरी ओळख मिळाली. चित्रपटात बोल्ड सीन्स देऊन शिल्पाने बॉलिवूडमध्ये खळबळ माजवली होती. चित्रपटातील एक ‘राधा बिना’मध्ये तिने पारदर्शक साडी नेसली होती. या चित्रपटात तिच्या सोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेत होता.

करिअरला लागला ब्रेक

यानंतर शिल्पाने तिच्या 10 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अमिताभ बच्चन, गोविंदा, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत काम केले. शिल्पाचे अनेक चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकले नाहीत. फ्लॉप चित्रपटांमुळे शिल्पाचे करिअरही उंचीवर पोहोचले नाही.

यूके स्थित बँकरशी लग्न

आपल्या करिअरची प्रगती पाहून शिल्पाने 2000 मध्ये यूके स्थित बँकर अपरेश रणजीतशी लग्न केले. लग्नानंतर शिल्पा लंडनमध्ये राहू लागली. शिल्पाला एक मुलगी आहे. शिल्पाच्या लग्नानंतर तिची बहीण नम्रता शिरोडकर हिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

शिल्पाचे मन अभ्यासात कधीच रमले नाही. एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, ‘मी 10वी नापास झाले आहे, पण मला त्याबद्दल कोणतीही खंत किंवा लाज वाटत नाही. मी सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप कमकुवत होते, त्यामुळे ती अभिनय क्षेत्रात आली हे चांगलेच झाले.  मात्र, परदेशात राहत असताना मला असे वाटले की माझे शिक्षण झाले असते, तर मी तिथे नोकरी करू शकले असते.’

‘या’ अभिनेत्यासोबत सर्वाधिक चित्रपट

शिल्पाने मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत सर्वाधिक चित्रपट केले आहेत. यामध्ये ‘हिटलर’, ‘भ्रष्टाचार’, ‘अपने दम पार’, ‘रंगबाज’, ‘जीवन की शतरंज’, ‘त्रिनेत्र’, ‘स्वर्ग यहां नर्क यहां’ आणि ‘पाप की कमाई’ यांचा समावेश आहे. शिल्पाच्या हिट चित्रपटांमध्ये हम (1991), दिल ही तो है (1992), आँखे (1993), खुदा गवाह (1993), गोपी-किशन (1993), हम हैं बेमिसाल (1994), बेवफा सनम (1995), मृत्युदंड (1995) आणि दंडनायक (1998) यांचा समावेश आहे.

13 वर्षांनी पुनरागमन

चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर अभिनेत्रीने 2013 साली ‘एक मुठ्ठी आसमान’मधून 13 वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. यानंतर 2016 मध्ये तिने टीव्ही मालिका ‘सिलसिला प्यार का’मध्ये देखील काम केले. ती कलर्स सीरियल ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’मध्येही दिसली होती.

हेही वाचा :

Farm Laws | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, प्रतिक्रिया देताना तापसी पन्नू म्हणते…

Hina Khan | हिना खानने बाथटबमध्ये केलं फोटोशूट, बोल्ड फोटोंनी घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ!

Non Stop LIVE Update
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु.
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले.
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?.
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान.
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध.
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील.
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.