Happy Birthday Upasana Singh | 80च्या दशकांत करिअरची सुरुवात, आता ‘पिंकी बुवा’ बनून छोटा पडदा गाजवतेय उपसना सिंह!

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये ‘पिंकी बुवा’ची भूमिका साकारून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी अभिनेत्री उपासना सिंह (Upasana Singh) आज (29 जून) आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. उपासनाचा जन्म होशियारपूर येथे झाला होता.

Happy Birthday Upasana Singh | 80च्या दशकांत करिअरची सुरुवात, आता ‘पिंकी बुवा’ बनून छोटा पडदा गाजवतेय उपसना सिंह!
उपासना सिंह
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 11:55 AM

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये ‘पिंकी बुवा’ची भूमिका साकारून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी अभिनेत्री उपासना सिंह (Upasana Singh) आज (29 जून) आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. उपासनाचा जन्म होशियारपूर येथे झाला होता. आपल्या विनोदी शैलीने सर्वांना खळखळवून हसवणार्‍या उपासना सिंहने अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आज उपासनाच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत (Happy Birthday Upasana Singh know about actress career journey).

अभिनेत्री उपासना सिंह यांनी 1986मध्ये ‘बाबुल’ या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. हिंदीसह उपासना सिंह यांनी पंजाबी, भोजपुरी आणि गुजराती भाषांमध्येही चित्रपट केले आहेत. तिने आतापर्यंत सुमारे 75 चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटाच्या विश्वात आपली खास जागा बनवल्यानंतर उपासना टीव्हीकडे वळली आणि तिला येथेही यश मिळाले.

‘अब्बा-डब्बा-जब्बा’ संवाद प्रसिद्ध!

उपासना सिंह हीचा ‘जुदाई’ चित्रपटाचा एक संवाद खूप प्रसिद्ध झाला. ‘अब्बा-डब्बा-जब्बा’ या संवादामुळे लोक अजूनही तिला ओळखतात. जेव्हा जेव्हा उपासना सिंह यांच्याबद्दल बोलले जाते, तेव्हा हा संवाद प्रथम घेतला जातो. तिने ‘ऐतराज’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘बादल’, ‘हंगामा’ अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. या सिनेमांमधील त्यांचे विनोदी संवाद आणि अभिनय शैली चांगलीच पसंत केली गेली होती.

‘सोनपरी’मध्ये बनली होती खलनायिका!

लहान मुलांचा आवडता लोकप्रिय शो ‘सोनपरी’मध्ये उपासना सिंहने नकारात्मक पात्र साकारले होते. शोमध्ये ‘काली परी’ बनून ती सर्वांना घाबरवताना दिसली. या शोमुळे त्याला घरोघरी एक वेगळी ओळख मिळाली होती. त्यांनी ‘मायका’, ‘राजा की आयेगी बरात’, ‘ढाबा जंक्शन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले होते. या सर्व मालिकांमध्ये उपासनाचा अभिनय खूपच पसंत केला गेला होता.

कपिल शर्माच्या शोमधून पुन्हा एकदा जिंकली मने!

‘द कपिल शर्मा शो’मधील ‘पिंकी बुवा’च्या व्यक्तिरेखेने पुन्हा एकदा उपासना सिंहला चर्चेत आणले. या पात्राने तिला पुन्हा प्रत्येक घराघरांत प्रसिद्ध केले. लोकांना तिची बोलण्याची शैली आणि विनोदाचे टायमिंग आवडते. उपासना सिंह यांनी 2009 मध्ये टीव्ही अभिनेता नीरज भारद्वाजशी लग्न केले होते. दोघे ‘ए दिल ए नादान’ या शोच्या सेटवर भेटले होते. जिथे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

(Happy Birthday Upasana Singh know about actress career journey)

हेही वाचा :

Rhea Chakraborty : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर रिया चक्रवर्तीनं शेअर केला स्वत:चा हसरा फोटो, म्हणाली…

‘जज अनेक पण हातवारे एक…’, सारेगमपचे ‘पंचरत्न’ परीक्षक सोशल मीडियावर ट्रोल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.