Tu Tevha Tashi: ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत कलाकारांची हापूस पार्टी
प्रेक्षकांना या मालिकेतील कलाकार हापूस पार्टी (Hapus Party) करताना पाहायला मिळणार आहेत. इतकंच नव्हे तर अनामिकाकडे होणाऱ्या हापूस पार्टीमध्ये सौरभ रमा आजीला अनामिकावर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुली देखील देणार आहे आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त करणार आहे.
20 मार्चपासून रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्वप्नील यात सौरभ तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारत आहे. या दोघांसोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेसुद्धा यामध्ये भूमिका साकारतेय.
आंब्यावर कलाकारांनी मारला ताव
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
या मालिकेबद्दल बोलताना स्वप्निल म्हणाला, “जळपास 7-8 वर्षांनंतर मेनस्ट्रीम टेलिव्हिजन करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी या मालिकेत माझ्या वयाची भूमिका साकारतोय. मी 44 वर्षांचा आहे आणि या वयोगटातली ही प्रेमकथा आहे. खूप वेगळी आणि आजची गोष्ट आहे जी प्रेक्षकांनी आजवर पाहिली नाही आहे. मी आणि शिल्पा बऱ्याच वर्षांनंतर एकत्र काम करतोय तसेच आम्ही मंदारसोबत देखील पहिल्यांदाच काम करतोय त्यामुळे ही मालिका त्यातील व्यक्तिरेखा हे सगळंच खूप फ्रेश आहे.”