Chala Hawa Yeu Dya: ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर सेलिब्रिटी कपल राणा दा-पाठकबाई आणि विराजस-शिवानीची धमाल
केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर या आठवड्यात प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर या आठवड्यात प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सध्या सुरु असलेल्या लग्नसराईमध्ये मराठी कलाविश्वातील काही कलाकारांची लग्न झाली आणि काही कलाकारांचा साखरपुडादेखील झाला. त्यातील सगळ्यात चर्चेत होते ते म्हणजे विराजस कुलकर्णी-शिवानी रंगोळे (Virajas Shivani) आणि प्रेक्षकांचा लाडका राणादा आणि पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. हे दोन्ही सेलेब्रिटी कपल (Celebrity Couple) या आठवड्यात चला हवा येऊ द्याच्या मंचावर येणार आहेत.
विराजस, शिवानी, हार्दिक आणि अक्षयासोबत अंशुमन विचारे, त्याची पत्नी आणि मुलगीदेखील हजर राहणार आहे. या विशेष भागात चला हवा येऊ द्याच्या विनोदवीरांनी राजा हिंदुस्तानी चित्रपटावर प्रहसन सादर केलं. ज्यात भाऊ आमिर खान आणि श्रेया बुगडे करिष्मा कपूर साकारणार आहेत. हे एपिसोड सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram हे सुद्धा वाचा
विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी 3 मे रोजी पुण्यात लग्नगाठ बांधली. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. तर हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी 3 मे रोजीच साखरपुडा केला. सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला.