‘मला माझ्यासोबत नाना हवे आहेत!’, ‘आई कुठे काय करते’च्या ‘अनघा’चा ‘हा’ खास टॅटू पाहिलात का?

अश्विनी आपल्या वडिलांना ‘नाना’ म्हणायची. आपले वडीलच आपले प्रेरणास्थान असल्याचे म्हणत ती नेहमीच आपल्या वडिलांचे आभार मानायाचिया. आता या खास टॅटूमुळे तिने पुन्हा एकदा आपल्या वडिलांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

‘मला माझ्यासोबत नाना हवे आहेत!’, ‘आई कुठे काय करते’च्या ‘अनघा’चा ‘हा’ खास टॅटू पाहिलात का?
अश्विनी महांगडे
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 2:11 PM

मुंबई : कोरोना संसर्गाच्या काळात अनेक जणांवर आपल्या प्रियजनांना गमावण्याची वेळ आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिच्यावरही दुःखद प्रसंग ओढावला होता. कोरोनाशी झुंज देताना अश्विनीचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे कोरोनाशी लढताना निधन झाले होते. “कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला” अशा शब्दात अश्विनीने फेसबुकवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. पितृछत्र हरपल्यानंतर आता अश्विनीने एक खास टॅटू कोरून घेत आपल्या वडिलांच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत.

अश्विनी आपल्या वडिलांना ‘नाना’ म्हणायची. आपले वडीलच आपले प्रेरणास्थान असल्याचे म्हणत ती नेहमीच आपल्या वडिलांचे आभार मानायाचिया. आता या खास टॅटूमुळे तिने पुन्हा एकदा आपल्या वडिलांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

‘आपल्या सोबत कोणी, कधी आणि किती रहावं हे आपण ठरवावे. मला माझ्या सोबत नाना हवे आहेत. तसे ते कायम आहेतच म्हणा’, असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या टॅटूमध्ये एक लहान मुलगी आपल्या वडिलांचा हात धरून पुढे जाताना दिसत आहे. आणि त्यात ‘नाना’ हे शब्द लिहिले आहेत. अश्विनीचा हा टॅटू चाहत्यांना प्रचंड आवडला असून, ते या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत, तिचे कौतुक करत आहेत.

अश्विनी महांगडेची कारकीर्द

छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्येची अर्थात ‘राणू अक्कां’ची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडेने साकारली आहे. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान नावाने सेवाभावी संस्थाही ती चालवते. या संस्थेअंतर्गत आजवर तिने अनेक उपक्रम राबवले आहेत. अश्विनीने आपल्या संस्थेमार्फत महाराष्ट्रभर विनामूल्य जेवणाची व्यवस्था सुरु केली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही तिने नागरिकांना मदत केली होती.

सामाजिक कार्यात सहभाग

अभिनयासोबतच अश्विनी सामाजिक कार्यात देखील तितकीच सक्रिय आहे. आपण समाजाचं देणं लागतो, अशी गाठ पदराला बांधत ती या क्षेत्रात देखील खंबीरपणे उभी ठाकली आहे. या कठीण काळात कुणीच उपाशी राहू नये, म्हणून अश्विनीने आपल्या संस्थेमार्फत महाराष्ट्रभर विनामुल्य जेवणासोबतच इतर जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याची व्यवस्था सुरु केली आहे.

स्त्रियांच्या समस्यांविषयी जनजागृती

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने सामजिक कार्य्सोबातच जनजागृतीचे कार्य देखील हाती घेतले आहे. स्त्रियांची मासिक पाली आणि त्यासंबंधातील अंधश्रद्धा-गैरसमज याबाबतीत जनजागृती करण्यासाठी तिने ‘महावारी’ नावाचा लघुपट तयार केला होता. याशिवाय दुर्गम भागांमध्ये जाऊन तिने स्वतःदेखील या विषयी जनजागृती केली होती.

हेही वाचा :

कुणाला जेवणाचे डबे, तर कुणाला औषध, ‘लॉकडाऊन’मध्ये ‘आई कुठे काय करते’ची अभिनेत्री करतेय रुग्णांची मदत!

‘स्वराज्य रक्षक संभाजी’मधील अभिनेत्रीचं हॉटेल, 40 रुपयांत भरपेट जेवण

Aai Kuthe Kay Karte | सेटवर वडिलांच्या निधनाची बातमी, अभिनेते महाबोले म्हणाले सीन पूर्ण करणारच

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.