Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा, जाणून घ्या तब्येतीविषयी महत्वाचे अपडेट…
राजू श्रीवास्तव हे गेल्या 20 दिवसांपासून एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. राजू हे अजूनही व्हेंटिलेटरवर असल्याने संसर्गाचा धोका अधिक आहे. यामुळे त्यांच्याजवळ कोणालाही जाऊ दिले जात नाहीयं. मात्र, त्यांच्या पत्नीला आयसीयूमध्ये जाण्यासाठी परवानगी हाॅस्पीटल प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती मिळतंय.
मुंबई : राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांच्या तब्येतीबाबत एक मोठी अपडेट आता पुढे येत असून राजू यांच्या प्रकृतीत अगोदरपेक्षा सुधारणा झाल्याचे सांगितले जात आहे. सर्वांना पोटधरून हसवणारे राजू श्रीवास्तव हे सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. राजू यांची तब्येत (Health) चांगली व्हावी, याकरिता संपूर्ण देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. नुकताच राजू यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्यासाठी त्यांचे कुटुंब गुरुद्वारात पोहोचले होते. रिपोर्ट्सनुसार राजू श्रीवास्तव हे डॉक्टरांच्या उपचारांना (Treatment) अगोदरपेक्षा आता चांगला प्रतिसाद देत आहेत, असे सांगितले जातंय. गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीतील एम्समध्ये राजू यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजू श्रीवास्तव यांच्या चांगल्या आरोग्यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना
काही दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या की, राजू यांच्या शरीराने काही हालचाली केल्या. या बातमीनंतर त्याच्या चाहत्यांना आणि जवळच्यांना दिलासा मिळाला आहे. राजू श्रीवास्तव हे गेल्या 20 दिवसांपासून शुद्धीवर आलेले नाहीत. संपूर्ण कुटुंब त्यांच्या काळजीसाठी एम्स रुग्णालयात आहे. इतकंच नाही तर त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
व्हेंटिलेटरवर असल्याने संसर्गाचा धोका अधिक
राजू श्रीवास्तव हे गेल्या 20 दिवसांपासून एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. राजू हे अजूनही व्हेंटिलेटरवर असल्याने संसर्गाचा धोका अधिक आहे. यामुळे त्यांच्याजवळ कोणालाही जाऊ दिले जात नाहीयं. मात्र, त्यांच्या पत्नीला आयसीयूमध्ये जाण्यासाठी परवानगी हाॅस्पीटल प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती मिळतंय. दिल्लीमध्ये व्यायाम करत असताना पडल्याने राजू श्रीवास्तव यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.