हिना खान हिने सर्व चर्चांना दिले पुर्णविराम अखेर ब्रेकअपवर म्हणाली…

इतकेच नाहीतर अनेकजण यांच्या लग्नाची देखील आतुरतेने वाट पाहात आहेत.

हिना खान हिने सर्व चर्चांना दिले पुर्णविराम अखेर ब्रेकअपवर म्हणाली...
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 4:41 PM

मुंबई : ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमधून एक खास ओळख निर्माण केलेली अभिनेत्री हिना खान तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. हिना हिने काही दिवसांपूर्वी धोका अशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. हिनाची ही पोस्ट पाहून अनेकांना वाटले की, हिनाला प्रेमामध्ये धोका मिळाला असून रॉकी जायसवालचे आणि तिचे ब्रेकअप झाले आहे. हिना आणि रॉकी यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. इतकेच नाहीतर अनेकजण यांच्या लग्नाची देखील आतुरतेने वाट पाहात आहेत.

हिना खान हिच्या सोशल मीडियाच्या पोस्टनंतर सातत्याने ब्रेकअपच्या चर्चा सुरू आहेत. आता यावर हिना खान हिने मोठे भाष्य केले आहे. हिना म्हणाली की, माझ्या पोस्टनंतर मला अनेकांनी काॅल आणि मेसेज केले होते.

माझ्या जवळच्या मित्र- मैत्रिणींना देखील माझे राॅकीसोबत ब्रेकअप झाल्याचे वाटले होते. परंतू तसे अजिबातच काही नाहीये. माझी लव्ह लाईफ चांगली सुरू असल्याचे देखील हिना खान हिने सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Hina Khan (@realhinakhan)

काही दिवसांपूर्वी हिना आणि राॅकी हे विदेशामध्ये फिरायला देखील होते. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. हिना खान हिने तिच्या आगामी मालिकेचे प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडियावर धोक्याची पोस्ट शेअर केली होती.

हिनाने ही पोस्ट सोशल मीडियावर तिच्या आगामी मालिकेच्या प्रमोशनसाठी टाकल्याचे चाहत्यांना समजल्यानंतर अनेकांनी हिनावर टिका केली. राॅकी आणि हिना यांची पहिली भेट ही ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवरच झालीये.

हिना आणि राॅकी हे आठ वर्षांपासून डेट करत आहेत. चाहते हिना आणि राॅकी यांच्या लग्नाची वाट गेल्या कित्येक वर्षांपासून पाहात आहेत. आजही चाहते हिना खान हिला अक्षरा नावाने ओळखतात.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.