Hruta Durgule: हृता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी बांधणार प्रतीक शाहशी लग्नगाठ

मराठी कलाविश्वातही लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्या लग्नाची चर्चा असतानाच आता आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीसुद्धा लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज झाली आहे. ही अभिनेत्री आहे हृता दुर्गुळे (Hruta Durgule).

Hruta Durgule: हृता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख आली समोर; 'या' दिवशी बांधणार प्रतीक शाहशी लग्नगाठ
Hruta Durgule, Prateek ShahImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 10:02 AM

गेल्या काही दिवसांत कलाविश्वात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाची धूम पहायला मिळाली. सोशल मीडियावर अद्यापही त्यांच्या लग्नाचे, मेहंदीचे आणि लग्नानंतरच्या पार्टीचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता मराठी कलाविश्वातही लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्या लग्नाची चर्चा असतानाच आता आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीसुद्धा लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज झाली आहे. ही अभिनेत्री आहे हृता दुर्गुळे (Hruta Durgule). हृताने प्रियकर प्रतीक शाहशी (Prateek Shah) गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात साखरपुडा केला. आता पुढील महिन्यात ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. (Hruta Durgule wedding date)

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री हृता आणि दिग्दर्शक प्रतीक हे 18 मे रोजी लग्न करणार आहेत. मुंबईतच हा लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नाच्या तारखेविषयी अद्याप हृता किंवा प्रतीकने माहिती दिली नाही. मात्र दोघांच्याही कुटुंबीयांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केल्याचं समजतंय. लग्नाच्या तारखेनुसार हृता आणि प्रतीकने त्यांच्या प्रोजेक्ट्सच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. हृता सध्या ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय. याशिवाय तिचे ‘अनन्या’ आणि ‘टाइमपास 3’ हे चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.

पहा हृताच्या साखरपुड्याचे फोटो-

View this post on Instagram

A post shared by Prateek Shah (@prateekshah1)

कोण आहे हृताचा होणारा पती?

प्रतीक शाह हा हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. अभिनेत्री मुग्धा शाह यांचा तो मुलगा आहे. प्रतीकने ‘बेहद 2’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदगी’ यांसारख्या हिट टेलिव्हिजन मालिकांचं दिग्दर्शिन केलं आहे. प्रतीक हा उत्तम डान्सरसुद्धा आहे. त्याच्या डान्सचे व्हिडीओ तो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

दुसरीकडे विराजस आणि शिवानीसुद्धा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती समोर येत आहे. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित असतील. त्यानंतर 7 मे रोजी मित्रपरिवारासाठी रिसेप्शन आयोजित करण्यात येईल.

हेही वाचा:

Sanjay Dutt: “पत्नी, मुलांचा विचार करत मी दोन-तीन तास रडलो”; संजय दत्तने सांगितला कॅन्सरशी लढा देतानाचा अनुभव

प्रतीकशी साखरपुडा केल्यानंतर हृताला आला वाईट अनुभव; चाहत्यांना विनंती करत म्हणाली..

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.