Karan Johar | नव्या कोऱ्या रिअॅलिटी शोची घोषणा; करण जोहर म्हणाला, यावेळी काहीतरी वेगळं होणार!

करण जोहर (Karan Johar) हा बॉलिवूड(Bollywood)मधील एक यशस्वी निर्माता-दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यानं इंस्टाग्राम (Instagram)वरून हुनरबाज (Hunarbaaz) या नव्या रिअॅलिटी शो (Reality Show)ची घोषणा केलीय.

Karan Johar | नव्या कोऱ्या रिअॅलिटी शोची घोषणा; करण जोहर म्हणाला, यावेळी काहीतरी वेगळं होणार!
करण जोहर
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 5:38 PM

मुंबई : करण जोहर (Karan Johar) हा बॉलिवूड(Bollywood)मधील एक यशस्वी निर्माता-दिग्दर्शकांपैकी एक आहे. जितकी लोकप्रियता मोठ्या पडद्यावर आहे, तितकाच तो छोट्या पडद्यावरही लोकप्रिय आहे. करणनं अनेक टीव्ही रिअॅलिटी शो(Reality Show)ज जज केलेत. टीव्ही शोचा भाग होण्यासाठी तो दरवर्षी वेळ काढत असतो. करणनं पुन्हा एकदा टीव्हीकडे वळण्याचा निर्णय घेतलाय, तेही एका नव्या रिअॅलिटी टॅलेंट शोच्या माध्यमातून… करणनं त्याच्या सोशल मीडिया(Social Media)वर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिलीय.

व्हिडिओ केला शेअर करणनं त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत म्हटलंय, की तो लवकरच एका नवीन रिअॅलिटी टॅलेंट शोद्वारे टीव्हीकडे वळणार आहे. हुनरबाज (Hunarbaaz) असं या शोचं नाव आहे. हा व्हिडिओ शोच्या प्रोमो व्हिडिओसारखा पाहिला जातोय. यात करण सेटवर दिसतोय. यात त्यानं कलरफूल सूट परिधान केलेला दिसतोय. हा व्हिडिओ शेअर करत त्यानं म्हटलंय, की, त्याला रिअॅलिटी टॅलेंट शोच्या जजच्या सीटवर बसायला का आवडते?

‘माझी जागा घेण्यास तयार’ करणनं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, की मला नेहमीच टॅलेंट शोच्या जजच्या सीटवर बसणं आवडतं. कारण या काळात मला माझ्या देशातील सर्वोत्तम प्रतिभा पाहण्याची संधी मिळते. मी आता पुन्हा माझी जागा घेण्यास तयार आहे. यावेळी काहीतरी वेगळं घडेल, असं मनापासून वाटतं. तसंच यावेळी ते थोडं अधिक खास असेल. Hunarbaaz लवकरच तुमच्या स्क्रीनवर दिसेल, कनेक्टेड रहा.

चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त तो गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. या चित्रपटाचं दिल्ली शेड्यूल पूर्ण केलंय. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt)ची जोडी यात साकारली आहे. हा चित्रपट अतिशय वेगानं बनवला जातोय. या दोन स्टार्सशिवाय धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आझमी (Shabana Azmi)हे दिग्गज कलाकारही या चित्रपटात काम करत आहेत. या चित्रपटाशिवाय करण जोहर रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या ‘ब्रह्मास्त्र'(Brahmastra)ची निर्मिती करतोय. त्याबाबत 15 डिसेंबरला नवीन घोषणा होणार आहेत.

Video : कोल्हापुरातील गव्याने घेतला तरुणाचा बळी, वनविभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप

Sharad Pawar Birthday : महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच 2024मध्ये दिल्लीत होईल; छगन भुजबळांचं मोठं विधान

Nagpur Tiger | तीन पिल्लांसह वाघीण बघीतली का? चला उमरेड करांडला अभयारण्यात

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.