Indian Idol 12 | पॉवर प्लेमध्ये सगळ्यात कमी मतं, मराठमोळी अंजली गायकवाड ‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर!
महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अंजली गायकवाड हिने तिच्या वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. ‘इंडियन आयडॉल 12’मध्ये सामील झालेली अंजली या स्पर्धेची सर्वात तरुण स्पर्धक होती. अंजलीने 2017मध्ये पार पडलेल्या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प’चे विजेतेपद मिळवले होते.
मुंबई : सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो, ‘इंडियन आयडॉल 12’च्या (Indian Idol 12) पॉवर प्लेमध्ये नुकतेच एक एलिमिनेशन पार पडले. याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. झीनत अमान स्पेशल एपिसोडनंतर शोचा होस्ट आदित्य नारायण याने जाहीर केले की, आज इंडियन आयडॉलला त्यांचे ‘टॉप 8’ स्पर्धक मिळणार आहेत आणि यामुळे पॉवर प्लेमध्ये दिलेल्या मतांच्या आधारे पहिल्या 9 स्पर्धकांपैकी एक स्पर्धक शो बाहेर होणार आहे. यावेळी आयडॉलची प्रसिद्ध स्पर्धक अंजली गायकवाड (Anjali Gaikwad) हिला कमी मते मिळाल्यामुळे ती शोमधून बाहेर पडली आहे (Indian Idol 12 Anjali Gaikwad eliminated in power play round).
महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अंजली गायकवाड हिने तिच्या वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. ‘इंडियन आयडॉल 12’मध्ये सामील झालेली अंजली या स्पर्धेची सर्वात तरुण स्पर्धक होती. अंजलीने 2017मध्ये पार पडलेल्या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प’चे विजेतेपद मिळवले होते.
अंजली एक प्रतिभावान गायिका!
अंजली एक प्रतिभावान पार्श्वगायिका आहे. अंजलीने ए.आर. रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. इंडियन आयडॉलच्या टॉप 9 पर्यंत पोहोचलेल्या या स्पर्धेत तिने तिच्या आवाजाच्या जादूने परीक्षक आणि प्रेक्षकांना वेड लावले होते. तिचे एलिमिनेशन परीक्षकांसाठीसुद्धा धक्का होता (Indian Idol 12 Anjali Gaikwad eliminated in power play round).
स्वप्न राहिले अपूर्ण
शोमधून बाहेर पडल्यामुळे अंजली गायकवाड हिचे तिच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. वास्तविक अंजलीचे वडील संगीत शिक्षक आहेत आणि आई गृहिणी आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान अंजलीच्या कुटुंबीयांना बर्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. शाळा बंद पडल्यामुळे तिचे वडील मुलांना संगीत शिकवू शकले नाहीत. आता त्यांनी मुलांना ऑनलाईन संगीत शिकवायला सुरुवात केली आहे. अंजलीला या कठीण काळात आयडॉलचे विजेतेपद मिळवून आपल्या कुटुंबाची मदत करायची होती. अंजलीची बहीण नंदिनी गायकवाडसुद्धा एक अप्रतिम गायिका आहे.
कोणाला मिळाली सर्वाधिक मते?
नेहमीप्रमाणे या पॉवर प्लेमध्ये देखील उत्तराखंडच्या पवनदीप राजन यालाच सर्वाधिक मते मिळाली आहेत. दिवसेंदिवस पवनदीपची लोकप्रियता वाढत चालली आहे.
(Indian Idol 12 Anjali Gaikwad eliminated in power play round)
हेही वाचा :
Kangana Ranaut: नवी नवेली दुल्हन यामी गौतमनं जिंकलं कंगनाचं मनं, कंगनानं दिल्या हटके शुभेच्छा
Khoya Khoya Chand : ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यावरअमिताभसोबत धमाल, आता कुठे आहे किमी?
OTT Movies : जूनमध्ये ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी, ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शितhttps://t.co/qOeQVcr26s#Ott #movies
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 6, 2021