Indian Idol 12 | इंडियन आयडॉल 12च्या स्पर्धेतून आशिष कुलकर्णी बाद, ‘हे’ असणार टॉप 6 स्पर्धक!

सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल 12च्या (Indian Idol 12) स्पर्धेमधून स्पर्धक-गायक आशिष कुलकर्णी एलिमिनेट झाला आहे. कमी मते मिळाल्यामुळे आशिषला शोच्या टॉप 6 मध्ये आपले स्थान मिळवता आले नाही.

Indian Idol 12 | इंडियन आयडॉल 12च्या स्पर्धेतून आशिष कुलकर्णी बाद, ‘हे’ असणार टॉप 6 स्पर्धक!
आशिष कुलकर्णी
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 10:50 AM

मुंबई : सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल 12च्या (Indian Idol 12) स्पर्धेमधून स्पर्धक-गायक आशिष कुलकर्णी एलिमिनेट झाला आहे. कमी मते मिळाल्यामुळे आशिषला शोच्या टॉप 6 मध्ये आपले स्थान मिळवता आले नाही. आशा भोसले स्पेशल भागातील सादरीकरणानंतर अनु मलिक म्हणाले की, यावेळी निर्णय पूर्णपणे जनतेने घेतला आहे. त्यांच्या या घोषणेनंतर, टॉप 7 स्पर्धकांना मंचावर बोलावण्यात आले. सर्व प्रथम, शोचे परीक्षक अनु मलिक यांनी सर्वाधिक मते मिळवलेल्या स्पर्धकांची नावे जाहीर केली (Indian Idol 12 Contestant Ashish Kulkarni eliminated).

अनु मलिक म्हणाले की, ‘स्पर्धक, जनतेचा निर्णय माझ्या हाती आला आहे. यात ज्या स्पर्धकाला सर्वाधिक मतं मिळाली आहेत, ती म्हणजे अरुणिता कांजीलाल. अरुणिताला अनु मलिकने सांगितले होते की, जनतेने तिला सर्वात जास्त मते दिली आहेत आणि त्यामुळे या आठवड्यात ती सुरक्षित आहे. पुन्हा एकदा तिला सेफ झोनमध्ये पाठवण्यात आले. अरुणिताचे नाव जाहीर केल्यानंतर कमीतकमी मते मिळाल्यामुळे बाहेर पडलेल्या स्पर्धकाचे नाव जाहीर करण्यात आले.

आशिष कुलकर्णीचा प्रवास संपला!

जनतेच्या निर्णयाच्या आधारे सर्वात कमी मते मिळवणारा स्पर्धक आशिष कुलकर्णी असल्याचे स्टेजवर जाहीर करण्यात आले. येथून आशिषचा इंडियन आयडॉलचा हा प्रवास संपला. आशिष या शोमधून बाहेर पडला आहे, हे ऐकून त्याची मानलेली बहीण षण्मुखप्रिया धायमोकलून रडू लागली. यावेळी व्हिडीओ स्क्रीनवर आशिषने शोमध्ये व्यतीत केलेले काही विशेष क्षण दाखवण्यात आले. आशिषच्या अगोदर अंजली गायकवाड, सवाई भट या प्रतिभावान स्पर्धकांनाही या शोचा निरोप घ्यावा लागला होता.

हे आहेत स्पर्धेचे टॉप 6 स्पर्धक

आशिष कुलकर्णी या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता या गायन रिअॅलिटी शोला टॉप 6 स्पर्धक मिळाले आहेत. उत्तराखंडचा पवनदीप राजन (Pawandeep Rajan From Uttarakhand), महाराष्ट्रातील सायली कांबळे (Sayli Kamble From Maharashtra), बेंगळुरूचा निहाल (Nihal From Banglore), हैदराबादची षण्मुखप्रिया (Shanmukhpriya From Hyderabad), कोलकाताची अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal from Kolkata) आणि उत्तर प्रदेशचा दानिश खान (Danish Khan From Uttar Pradesh)  हे या शोचे टॉप सहा स्पर्धक आहेत. म्हणजेच यापैकी एक ग्रँड फिनालेमध्ये इंडियन आयडॉल 12ची ट्रॉफी जिंकेल.

(Indian Idol 12 Contestant Ashish Kulkarni eliminated)

हेही वाचा :

Baby Vamika | विरुष्काची लेक वामिका झाली 6 महिन्यांची! पार्कात झालं सेलिब्रेशन, अनुष्काने शेअर केले खास फोटो!

अबब! दीपिका पदुकोणच्या ‘या’ स्वेटरची किंमत माहिती आहे का?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.