रब ने बना दी जोडी! लंडनमध्ये हातात हात घालून दिसले ‘इंडियन आयडॉल १२’ फेम पवनदीप-अरुणिता

इंडियन आयडॉलचा बारावा सिझन संपल्यानंतरही पवनदीप-अरुणिता (Pawandeep Rajan Arunita Kanjilal) हे सोशल मीडियावर चर्चेत होते. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या लग्नाचेही फोटो व्हायरल झाले होते.

रब ने बना दी जोडी! लंडनमध्ये हातात हात घालून दिसले 'इंडियन आयडॉल १२' फेम पवनदीप-अरुणिता
Pawandeep Rajan Arunita Kanjilal Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 5:51 PM

‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol 12) या रिअॅलिटी शोचा बारावा सिझन चांगलाच गाजला. पवनदीप राजनने (Pawandeep Rajan) या सिझनचं विजेतेपद पटकावलं. या सिझनमध्ये पवनदीपचं नाव अनेकदा अरुणिता कांजीलालसोबत (Arunita Kanjilal) जोडलं गेलं होतं. या दोघांच्या प्रेमकथेची जोरदार चर्चा होती. प्रत्येक एपिसोडमध्ये या दोघांना इतर स्पर्धकांकडून चिडवलं जात किंवा मग ते दोघे एकत्र सादरीकरण करत. पवनदीप-अरुणिता या जोडीला चाहत्यांकडूनही तेवढंच प्रेम मिळालं. इतकंच काय तर वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवरही या दोघांचे व्हिडीओ शेअर केले जात. इंडियन आयडॉलचा बारावा सिझन संपल्यानंतरही पवनदीप-अरुणिता हे सोशल मीडियावर चर्चेत होते. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या लग्नाचेही फोटो व्हायरल झाले होते. मात्र त्या केवळ अफवा असल्याचं नंतर स्पष्ट झालं. आता पुन्हा एकदा पवनदीप आणि अरुणिता यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लंडनमधील हा व्हिडीओ असून यामध्ये दोघंही हातात हात घालून चालताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये लंडनच्या रस्त्यावर आणखी एका व्यक्तीसोबत गप्पा मारत पवनदीप आणि अरुणिता चालताना दिसत आहेत. यावेळी दोघांनीही एकमेकांचा हात हातात घेतला आहे. या व्हिडीओवर पवनदीप-अरुणिताच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘रब ने बना दी जोडी’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘ही जोडी आणि त्यांचं गायनकौशल्य उत्तम आहे’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. ‘मेड फॉर इच अदर’ असंही एकाने कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

पवनदीपने ‘इंडियन आयडॉल’चं बारावं पर्व जिंकलं होतं. तर अरुणिता दुसऱ्या क्रमांकावर होती. सायली कांबळेनं तिसरं स्थान पटकावलं होतं. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या शोचा ग्रँड फिनाले पार पडला होता. पवनदीपचं नाव विजेता म्हणून घोषित होताच अरुणिताने त्याच्या जवळ जात त्याला मिठी मारली होती.

आदित्य नारायणने नाकारल्या होत्या अफेअरच्या चर्चा गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत ‘इंडियन आयडॉल’चा सूत्रसंचालक आदित्य नारायण याने पवनदीप आणि अरुणिताच्या अफेअरच्या चर्चा नाकारल्या होत्या. पब्लिसिटी स्टंटसाठी या दोघांचा रोमँटिक अँगल शोमध्ये दाखवण्यात आला असल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. “आम्ही मस्करी करत होतो. लोक म्हणतात आम्ही अशा अफेअरच्या चर्चा शोमध्ये रंगवतो. मग काय झालं? आम्ही त्याला नकार देत नाही. लोकांना ते पाहण्यात मजासुद्धा येते”, असं तो म्हणाला होता.

संबंधित बातम्या: पवनदीप-अरुणिता खरंच एकमेकांच्या प्रेमात पडलेयत? पाहा आदित्य नारायण काय म्हणाला…

संबंधित बातम्या: शेवटी पवनदीप राजनने करुन दाखवलं ! पाच स्पर्धकांना मागे टाकत ठरला इंडियन आयडॉल

संबंधित बातम्या: कोरोनावर मात, खास मैत्रीण अरुणितासह पवनदीप राजनने साजरा केला वाढदिवस, पाहा फोटो

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.