‘Indian Idol 12’ होस्ट आदित्य नारायण-श्वेता अग्रवालच्या घरी ‘गुडन्यूज’? चाहत्यांना दिले संकेत!

गायक आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न गाठ बांधली होती. दोघेही बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

‘Indian Idol 12’ होस्ट आदित्य नारायण-श्वेता अग्रवालच्या घरी ‘गुडन्यूज’? चाहत्यांना दिले संकेत!
आदित्य नारायण-श्वेता
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 12:48 PM

मुंबई : गायक आणि टीव्ही होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न गाठ बांधली होती. दोघेही बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आदित्यने नुकताच होस्टिंगपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. यासह, त्याने आपल्या मुलाखतीत एक गोड इशारा दिला आहे की, तो लवकरच बाबा होणार आहे.

आदित्यने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘पुढच्या वर्षी मी टीव्हीपासून ब्रेक घेणार आहे. मी खूप आभारी आहे की, मला एकाच वेळी बर्‍याच गोष्टी करण्याची संधी मिळाली, पण ती दमछाक करणारी आहे. गेल्या 15 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग असल्याबद्दल मी सगळ्यांचा खूप आभारी आहे. पण आता दुसर्‍या कशाकडे तरी जाण्याची वेळ आली आहे.’

लवकरच ‘बाबा’ होणार?

आदित्य पुढे म्हणाला की, छोट्या पडद्यावर होस्टिंग करण्यास सुरूवात केली तेव्हा मी किशोरवयीन होतो, पुढील वर्षापर्यंत मी हे काम सोडणार आहे. मी लवकरच बाबा होणार आहे. या उद्योगाने मला नाव, पैसा आणि यश दिले आहे.

आदित्य नारायण इंडियन आयडॉलच्या होस्टिंगसाठी अधिक ओळखला जातो. श्वेता आणि आदित्यने गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली आणि नंतर ते हनिमूनसाठी काश्मीरला गेले होते. एका मुलाखतीत आदित्यने सांगितले होते की, माझ्यासाठी हा वेळ खूप कठीण गेला आहे. ती माझ्या घराच्या अगदी जवळ राहायची तरी गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे मी श्वेताला भेटू शकलो नाही.

आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले

तब्बल 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेण्याविषयी बोलताना आदित्य (Aditya Narayan) म्हणाला, ‘प्रत्येक नात्याप्रमाणे आमच्या न्यात्यानेही गेल्या 10 वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. या सगळ्यात आम्ही एकमेकांना अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आहे. लग्न ही केवळ फॉर्मेलिटी आहे. या वर्षाअखेरीस आम्ही लग्न करणार आहोत. आई-वडिलांनाही श्वेताबद्द्ल माहिती आहे. त्या दोघांनाही ती खूप आवडते. इतक्या छान जोडीदारामुळे मी देखील खूप खुश आहे.’

एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ दिला

‘प्रत्येक नात्यात काहीना काही अडचणी असतात. याचा अर्थ असा नाही की, ते नाते नाते संपवले पाहिजे. आजकाल अशी लग्न फार कमी कालावधीत तुटतात. त्यामुळे आम्ही एकमेकांना जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ घेतला. 10 वर्ष एकमेकांसोबत घालवल्यावर, आता या नात्याला पुढे नेण्याचे आम्ही ठरवले आहे,’ असे म्हणत आदित्यने त्याच्या नातेसंबधातील भावनिक बंध उलगडला. काही महिन्यांपूर्वी आमच्यात भांडण झाल्याने, आम्ही वेगळे झालो, अशा अफवा पसरल्या होत्या. तेव्हा श्वेतासोबत बाहेर जाणेदेखील मुश्कील झाले होते, असे आदित्य म्हणाला.

(Indian Idol 12 host Aditya Narayan And Wife Shweta Agarwal Expecting First Child Together)

हेही वाचा :

‘त्या अ‍ॅपसाठी त्याने मलाही संपर्क केला होता’, युट्यूबर पुनीत कौरचे राज कुंद्रावर गंभीर आरोप

राज कुंद्रा प्रकरण ऐकून कंगना रनौत संतापली, म्हणाली ‘म्हणूनच मी संपूर्ण इंडस्ट्रीला गटार…’

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.