Indian Idol 12 | सायली कांबळेमुळे ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर पवनदीपने केलं असं काही की, बघणारेही झाले अवाक्!

‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) या लोकप्रिय शोचा रविवारचा एपिसोड खास ‘फ्रेंडशिप डे’वर आधारित होता. निर्मात्यांनी या खास ‘फ्रेंडशिप डे स्पेशल’ एपिसोडसाठी कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांना बोलावले होते.

Indian Idol 12 | सायली कांबळेमुळे ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर पवनदीपने केलं असं काही की, बघणारेही झाले अवाक्!
सायली-पवनदीप
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 12:03 PM

मुंबई : ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) या लोकप्रिय शोचा रविवारचा एपिसोड खास ‘फ्रेंडशिप डे’वर आधारित होता. निर्मात्यांनी या खास ‘फ्रेंडशिप डे स्पेशल’ एपिसोडसाठी कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांना बोलावले होते. या दरम्यान, सर्व स्पर्धकांनी मंचावर दमदार सादरीकरण केले. स्पर्धक-गयिका सायली कांबळे (Sayali Kamble) हिने ‘आज मैं ऊपर आसमां नीचे’ (Aaaj Main Upar Aasman Niche),  आणि ‘मेरा पिया घर आया’ (Mera Piya Ghar Aaya) या गाण्यांवर सादरीकरण केले. यावेळी शोचे तीनही परीक्षक अनु मलिक (Anu Malik), सोनू कक्कर (Sonu Kakkar) आणि हिमेश रेशमिया (Himesh Reshammmiya) तसेच, पाहुणे परीक्षक कुमार सानू आणि कविता यांना सायलीचे हे दमदार सादरीकरण खूप आवडले.

तथापि, या दरम्यान असे काही घडले जे प्रत्येकजण या शोच्या सुरुवातीपासूनच करण्याचा प्रयत्न करत होता. खरं तर, नेहमी शांतपणे सादरीकरण देणारा पवनदीप राजन, सायलीच्या या पर्फोर्मंसदरम्यान चक्क धमाल डान्स करताना दिसला..

काय घडलं मंचावर?

सायलीच्या सदरीकरणानंतर, शोचा होस्ट आदित्य नारायण स्टेजवर आला आणि म्हणाला की, ‘सायली आज तु असे काही केले आहेस, जे शोच्या सुरुवातीपासूनच आम्हाला सर्वांनाच करायचे होते.’. यानंतर पवनदीपचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला आहे, ज्यात तो निहालसोबत डान्स करत आहे. यानंतर, मग पवनदीपला स्टेजवर बोलावले जाते आणि दोघेही धमाल डान्स करतात. सायलीने या दोघांसाठी ‘जवानी जानेमन’ हे गाणे गायले आणि या गाण्यावर पवनदीपने एक मजेदार डान्स केला.

पवनदीपचा डान्स पाहून बाकीचे स्पर्धक आणि परीक्षकही हसायला लागतात. कुमार सानू म्हणतात, ‘पवनदीप मला तुमचा जॉगिंग डान्स खूप आवडला. असा डान्स मी यापूर्वी कधीही पाहिला नाही.’

पाहा व्हिडीओ :

कविता कृष्णामुर्तींनी सांगितले कुमार सानूचे रहस्य

पवनदीपचा डान्स झाल्यानंतर आदित्य कविता यांना विचारतो की, तुम्ही दोघांनी मिळून इतकी गाणी गायली आहेत. तुमची मैत्री खूप घट्ट आहे, त्यामुळे तुमचा एकत्र गाण्याचा अनुभव कसा होता? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘आमची भेट स्टुडीओच्या बाहेरच व्हायची. सर एका दिवसात 5-6 गाणी गात असत. कवितासोबत उभे राहून गाणे गाण्यासाठी त्याला वेळ कुठे होता. मी रेकॉर्डिंगला जायचे आणि मग कळायचं की सानूजी इकडे-तिकडे शो करत आहेत.’

पंचम दांनी रेकॉर्ड केले दोघांचे एकत्र गाणे

कविता म्हणतात की, पंचम दा यांच्यामुळे एक दिवस आम्ही एकत्र गाणे रेकॉर्ड केले. त्यांनी आम्हा दोघांना एकत्र गाणे रेकॉर्ड करायला सांगितले. त्यांच्यामुळे मला यांच्यासोबत गाणे रेकॉर्ड करण्याचा बहुमान मिळाला होता.’

(Indian Idol 12 When Pawandeep Rajan Dances on Sayali Kamble’s Performance)

हेही वाचा :

Bigg Boss 15 | सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, कॉमेडीयन ‘बिग बॉस 15’मध्ये सहभागी होण्याची शक्यता!

‘बडे अच्छे लगते हैं 2’ मालिकेत काम करण्यासाठी दिव्यांका त्रिपाठीचा नकार, म्हणाली…

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.