ज्या वडिलांच्या उपचारासाठी स्पर्धेत सहभागी झाला, नियतीने त्यांनाच हिरावून नेलं! India’s Best Dancer फेम संकेतला पितृशोक
‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2’च्या स्टेजवर स्पर्धक म्हणून सामील झालेल्या संकेत गावकरने यापूर्वी 4 डान्स रिअॅलिटी शो जिंकले आहेत. परंतु, त्याच्या वडिलांच्या कर्करोगामुळे त्याला पुन्हा एकदा डान्स रिअॅलिटी शोच्या जगात प्रवेश करावा लागला.
मुंबई : मूळचा कर्नाटकातील असणारा डान्सर संकेत गावकर याच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2’च्या स्टेजवर स्पर्धक म्हणून सामील झालेल्या संकेत गावकरने यापूर्वी 4 डान्स रिअॅलिटी शो जिंकले आहेत. परंतु, त्याच्या वडिलांच्या कर्करोगामुळे त्याला पुन्हा एकदा डान्स रिअॅलिटी शोच्या जगात प्रवेश करावा लागला. संकेत आपल्या वडिलांच्या या आजारावर उपचार करण्यासाठी ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2’मध्ये सामील झाला होता.
वास्तविक, कालच्या ‘मा स्पेशल’ एपिसोडमधून संकेत गायब झाला होता, त्यामुळे त्याचे चाहते त्याच्याबद्दल थोडेसे चिंतेत पडले होते. संकेतने त्याच्या वडिलांच्या निधनाची माहिती त्याच्या सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. वडिलांसोबतचे काही फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, पापा तुमच्या आत्म्याला शांती लाभो. देवा माझ्या वडिलांना सदैव आनंदी ठेव. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा, मला आयुष्यभर तुमची आठवण येईल. आणि मी तुम्हाला एक दिवस स्वर्गात भेटेन. #माझा सुपरहिरो. #बाबा.’
पाहा पोस्ट :
View this post on Instagram
मित्रांनी वाहिली श्रद्धांजली
संकेतच्या या पोस्टच्या खाली त्याचे मित्र आणि चाहत्यांनी त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘डान्स दिवाने 3’चा विजेता पियुष गुरभेले यानेही संकेतच्या या पोस्टच्या खाली कमेंट केली आहे आणि लिहिले आहे की ‘भाऊ, तू मजबूत रहा. काकांच्या आत्म्याला शांती लाभो.’ संकेत गावकर आणि पियुष या दोघांनी डान्स इंडिया डान्समध्ये त्यांचे नृत्य कौशल्य दाखवले होते. संकेत हा डीआयडीचा विजेता, तर पीयूष उपविजेता ठरला होता.
घशाच्या कर्करोगामुळे निधन
इंडियाज बेस्ट डान्सरच्या सुरुवातीला ऑडिशन राऊंडदरम्यान संकेतने सांगितले होते की, दोन महिन्यांपूर्वी त्याला कळले की, त्याच्या वडिलांना घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. रिअॅलिटी शो जिंकून त्याने जमवलेले सगळे पैसे वडिलांच्या उपचारावर खर्च केले. पण संकेतला भारतातील सर्वोत्कृष्ट डान्सरचा भाग व्हायचे होते कारण त्याला कर्करोगाच्या उपचारासाठी अधिक पैशांची गरज होती. वडिलांच्या गळ्यात एक नळी घातली होती आणि त्या नळीतूनच त्यांना अन्न द्यायचे होते, असे संकेतने सांगितले होते.
आयबीडी टीमने मदत केली
संकेतची हृदयद्रावक कथा ऐकल्यानंतर IBD परीक्षक आणि त्यांच्या टीमने त्याला मदत केली. इतकंच नाही तर शोचा होस्ट मनीष पॉल याने संकेतच्या वडिलांसाठी IBD च्या स्टेजवर खास जागा राखून ठेवली होती. संकेतचे वडील परत आल्यावर या खुर्चीवर बसतील, असे तो म्हणाला होता. पण नियतीच्या दुर्दैवी खेळामुळे आता हे स्वप्न अपूर्णच राहिले.