Jai Jai Swami Samarth: ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत महत्त्वाचा टप्पा; स्वामी समर्थांच्या कृपेने भक्ताला मिळणार जीवनदान

'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेच्या माध्यमातून स्वामीच्या चरित्रातले असे अनेक प्रसंग प्रेक्षक अनुभवत आहेत. काळ बदलला असला तरी आजही स्वामींच्या (Swamy Samarth) कृपेची प्रचिती भक्तांना येतेच आहे.

Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत महत्त्वाचा टप्पा; स्वामी समर्थांच्या कृपेने भक्ताला मिळणार जीवनदान
Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत महत्त्वाचा टप्पाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 3:22 PM

भक्ताने पूर्ण श्रद्धेने, निर्मळ मनाने स्वामींपुढे केलेली प्रार्थना किंवा मागणी कधी पूर्ण झाली नाही असं होत नाही. प्रत्येक अडीअडचणीच्या काळात स्वामी भक्ताला योग्य तो मार्ग दाखवतात आणि सुखरूप संकटातून बाहेर काढतात. स्वामी आपल्या भक्तांची कठीण परीक्षादेखील घेतात. जय जय स्वामी समर्थ (Jai Jai Swami Samarth) या मालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच घटना घडत आहेत. स्वामींनी नेहेमीच भक्तांचा उध्दार केला आहे, त्यांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत, त्यांनी अनेक रूपं घेऊन भक्तांची मदत केली आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेच्या माध्यमातून स्वामीच्या चरित्रातले असे अनेक प्रसंग प्रेक्षक अनुभवत आहेत. काळ बदलला असला तरी आजही स्वामींच्या (Swamy Samarth) कृपेची प्रचिती भक्तांना येतेच आहे.

मालिकेमध्ये बहिरेशास्त्री नामक गृहस्थ मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांच्या मुलाचा मृत्यू जवळ आला आहे आणि त्यांना आपल्या मुलाला या मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढायचं आहे. त्यांच्या कानावर असं येतं की अक्कलकोट येथे गेलात तर स्वामी समर्थ यांच्या कृपेने आलेलं संकट दूर होईल. अक्कलकोट येथे आल्यावर त्यांची भेट अर्थात सुंदराबाईंसोबत होते. सुंदराबाई याच गोष्टीचा फायदा घ्यायला बघतात आणि स्वामींपर्यंत पोहचायचे असेल तर मीच तुम्हाला मदत करू शकते असं बहिरेशास्त्री यांना सांगते. पण, काही केल्या त्यांची भेट स्वामींशी होऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांना खूप चिंता होऊ लागते.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

मेघ:श्याम म्हणजे त्यांच्या मुलाकडे अवघा एक महिना आहे. असं काय घडतं की स्वामी आणि मेघ:श्याम यांची भेट घडून येते. स्वामी त्याची इच्छा पूर्ण करतात आणि तिथूनच त्या दोघांची गट्टी जमते. आता स्वामी त्याला मृत्यूच्या छायेतून कसं बाहेर काढणार, कसं भक्ताला जीवनदान मिळणार, सुंदराबाईला स्वामी कसा धडा शिकवणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळेल. जय जय स्वामी समर्थ ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.