Bigg Boss Marathi season 5 : 9 लाख रुपयांचं घबाड घेऊन नशीब चमकवलं, बिग बॉसच्या ग्रँड फिनालेत जान्हवी किल्लेकरची मोठी खेळी

'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये यशस्वी स्पर्धक ठरली. तिने आखलेली रणनीती अतिशय यशस्वी ठरल्यामुळे ती तब्बल 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडली आहे.

Bigg Boss Marathi season 5 : 9 लाख रुपयांचं घबाड घेऊन नशीब चमकवलं, बिग बॉसच्या ग्रँड फिनालेत जान्हवी किल्लेकरची मोठी खेळी
बिग बॉसच्या ग्रँड फिनालेत जान्हवी किल्लेकरची मोठी खेळी
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 7:39 PM

बिग बॉस सीजन पाचचा ग्रँड फिनाले पार पडत आहे. या फिनालेत आता जसजसा वेळ पुढे सरकत आहे, तसतशी आता चुरस वाढताना दिसत आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेपर्यंत घरात आतापर्यंत 6 स्पर्धक होते. पण आता या फिनालेमध्ये पहिलं इलिमिनेशन कार्य पार पडलं आहे. 6 स्पर्धाकांपैकी 1 स्पर्धक आता बाद झाला आहे. ग्रँड फिनालेमध्ये अभिजीत सावंत, अंकिला वालावलकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, सुरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक होते. अखेर ग्रँड फिनाले सुरु झाला आहे आणि या ग्रँड फिनालेमधून सहावा स्पर्धक घराबाहेर पडला आहे. ही सहावी स्पर्धक जान्हवी किल्लेकर आहे. पण जान्हवी किल्लेकर बाद झाली असली तरी 9 लाख रुपयांची बँग घेऊन ती घराबाहेर पडली आहे.

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेत आज एक टास्क पार पडला. यावेळी सहाही स्पर्धकांना एक ऑफर देण्यात आली. सर्व स्पर्धकांना गेम सोडण्यासाठी 7 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. सर्व स्पर्धकांपैकी कुणीतरी एकाने गेम सोडला तर त्याला 7 लाख रुपये मिळतील, अशी ऑफर देण्यात आली. पण सर्व स्पर्धकांनी ती ऑफर नाकारली. यानंतर बिग बॉसने या टास्कमध्ये आणखी एक ट्विस्ट आणला. बिग बॉसने आणखी 2 लाख रुपये वाढवत जो स्पर्धक पळत जाऊन बझर वाजवेल तो स्पर्धक 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडेल, असं जाहीर करण्यात आलं.

बिग बॉसची ही ऑफर ऐकल्यानंतर जान्हवी आपल्या जागेवरुन बाहेर पडली. ती बझरच्या दिशेला गेली. ती बझर जवळ गेली आणि त्याला रडू आलं. यावेळी रितेश देशमुख यांनी तिला तिच्या रडण्यामागचं कारण विचारलं. यावेळी जान्हवी हिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. आपल्या डोळ्यांसमोर आपला प्रवास आठवत असल्याचं ती म्हणाली. आपण घरात सुरुवातीला वर्षा उसगांवकर आणि पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केला. नंतर आपण बदललो. पण आपल्यावरती प्रेक्षकांचा असलेला रोष अजूनही पाहिजे तसा कमी झालेला नाही. त्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं जान्हवीने स्पष्ट केलं. यानंतर जान्हवीने बझर वाजवला आणि ती 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडली.

यावेळी एक मजेशीर गोष्ट बघायला मिळाली. जान्हवीने बझर वाजवल्यानंतर रितेश देशमुख यांनी घरसोडून जाणाऱ्या किंवा बाद होणाऱ्या सहाव्या स्पर्धकाचं नाव सांगितलं. ते नाव जान्हवी किल्लेकर हिचंच निघालं. त्यामुळे जान्हवी किल्लेकर हिच्यासाठी 9 लाख रुपये घेण्याची डील फायदेशीर ठरली. त्यामुळे रितेश देशमुख यांनी आपण जान्हवी यांना टास्क क्वीन म्हटलं ते अतिशय योग्य असल्याचं मत यावेळी मांडलं.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.