Tejasswi Prakash: ‘तुम्ही अत्यंत खालची पातळी गाठली’; तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यांवर भडकला करण

'तुम्ही अत्यंत खालची पातळी गाठली' असं म्हणत करणने त्यांच्यावर राग व्यक्त केला. करणच्या या ट्विटनंतर तेजस्वीने त्याची साथ दिली. करणबद्दल वाईट बोलणारे माझे चाहते असूच शकत नाहीत, असं तेजस्वी म्हणाली. या दोघांचा ट्विटरवरील संवाद सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Tejasswi Prakash: 'तुम्ही अत्यंत खालची पातळी गाठली'; तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यांवर भडकला करण
Karan Kundrra and Tejasswi PrakashImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 5:37 PM

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि अभिनेता करण कुंद्राची (Karan Kundrra) जोडी ‘बिग बॉस 15’पासून (Bigg Boss) प्रचंड चर्चेत आली. बिग बॉसच्या घरात हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि शोमधून बाहेर पडल्यानंतरही दोघं एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र तेजस्वीच्या चाहत्यांवर करणने ट्विटरच्या माध्यमातून राग व्यक्त केला. करणबद्दल त्यांनी खोटे मेसेज आणि खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. ‘तुम्ही अत्यंत खालची पातळी गाठली’ असं म्हणत करणने त्यांच्यावर राग व्यक्त केला. करणच्या या ट्विटनंतर तेजस्वीने त्याची साथ दिली. करणबद्दल वाईट बोलणारे माझे चाहते असूच शकत नाहीत, असं तेजस्वी म्हणाली. या दोघांचा ट्विटरवरील संवाद सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

मंगळवारी करणने ट्विटर काही स्क्रीनशॉट्स पोस्ट केले. सोशल मीडियावर तेजस्वीचे काही चाहते त्याला बरंवाईट बोलत असल्याची तक्रार त्याने केली. ‘करणला सोडल्यास तेजस्वी तिच्या करिअरमध्ये खूप पुढे जाऊ शकते’, असं चाहत्यांनी त्यावर लिहिलं होतं. त्याप्रमाणे तेजस्वीबद्दलचे करणचे मेसेज मॉर्फ करून त्यांनी सोशल मीडियावर ते व्हायरल केले होते. यावर करणने ट्विट करत लिहिलं, ‘वॉव.. अत्यंत खालची पातळी तुम्ही गाठली आहे. फोटो एडिट करून, मेसेज मॉर्फ करून तुम्ही स्वत:चाच अपमान करत आहात. तेजस्वी तुला यांचा खूप अभिमान वाटत असेल.’

हे सुद्धा वाचा

करण कुंद्राचं ट्विट-

करणच्या या मेसेजवर तेजस्वीने लगेच उत्तर दिलं. ‘अभिमान? मी तर संभ्रमात आहे. असे लोक माझे चाहते असूच शकत नाही. तुझ्याबद्दल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीबद्दल जे लोक असे विचार करतात ते माझे चाहते असूच शकत नाहीत.’ आपल्या मदतीला तेजस्वी धावून आल्याचं पाहताच करणने पुन्हा तिच्यासाठी ट्विट केलं. ‘अशा गोष्टींना तू मनाला लावून घेऊ नकोस. अशा गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. याठिकाणी फक्त त्यांचा ढोंगीपणा उघड होतोय. तू लवकर ये, अशा मूर्ख लोकांना मी सांभाळून घेईन’, असं त्याने लिहिलं.

तेजस्वी प्रकाशचं उत्तर-

तेजस्वी आणि करणला चाहत्यांनी ‘तेजरण’ असं नाव दिलं असून सोशल मीडियावर ते याच नावाने ओळखले जातात. या दोघांच्या चाहत्यांनीही कमेंट्स करत अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. करण कुंद्रा सध्या ‘डान्स दिवाने ज्युनिअर्स’ या शोचं सूत्रसंचालन करतोय. तर तेजस्वी ‘नागिन 6’ या मालिकेत भूमिका साकारतेय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.