Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 14: स्पर्धकाने बिग बींवर लावला कर्जाचा आरोप, अमिताभ बच्चन यांनी व्याजासह 10 रुपये केले परत

यावेळी त्यांनी शोचे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर मोठा आरोप केला. त्यांचा आरोप ऐकून अमिताभ बच्चनसुद्धा काही काळ स्तब्ध झाले.

KBC 14: स्पर्धकाने बिग बींवर लावला कर्जाचा आरोप, अमिताभ बच्चन यांनी व्याजासह 10 रुपये केले परत
Amitabh BachchanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 9:25 AM

दुलीचंद अग्रवाल यांनी सोनी टीव्हीच्या क्विझ रिॲलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती 14’मधून (Kaun Banega Crorepati) 50 लाख रुपये जिंकले आहेत. मात्र, यावेळी त्यांनी शोचे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर मोठा आरोप केला. त्यांचा आरोप ऐकून अमिताभ बच्चनसुद्धा काही काळ स्तब्ध झाले. खरं तर, छत्तीसगडच्या पिथोरा इथले रहिवासी असलेल्या दुलीचंद अग्रवाल यांनी जेव्हा बिग बींची 3 लाख 20 हजार जिंकल्याची घोषणा ऐकली, तेव्हा त्यांनी लगेच बिग बींना सांगितलं की, “तुम्ही मला देत असलेल्या 3 लाख 20 हजार रुपयांमध्ये 10 रुपये कमी आहेत.” अमिताभ बच्चन यांनी दुलीचंद (Dulichand) यांचं म्हणणं ऐकलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. दुलीचंद यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितलं की, त्यांचा 1977 चा हिशोब त्यांच्याकडे पेंडिंग आहे. बिग बींवर 10 रुपयांचं त्यांचं कर्ज आहे. अमिताभ बच्चन देखील हसले आणि म्हणाले “मी तुमचा ऋणी आहे, पण काही हरकत नाही. हा खेळ संपल्यानंतर मी तुम्हाला 20 रुपये देईन.”

काय आहे 10 रुपयांच्या कर्जाचा किस्सा?

दुलीचंद यांचा हा किस्सा ऐकून प्रेक्षकदेखील थक्क झाले. डीसी अर्थात दुलीचंद म्हणाले की, “मी कॉलेजमध्ये होतो, जेव्हा तुमचा मुकद्दर का सिकंदर हा चित्रपट 1977 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या काळात आमच्याकडे फारसे पैसे नव्हते. पण मला तो चित्रपट बघायचा होता. खिशात 10 रुपये घेऊन हा चित्रपट पाहण्यासाठी मी थिएटरमध्ये गेलो होतो. मला वाटलं 1 रुपयाचं तिकीट काढावं आणि उरलेल्या पैशांनी समोसे खावे. ते 10 रुपये कसे खर्च करायचे हे सर्व मी ठरवलं होतं.”

हे सुद्धा वाचा

पुढे दुलीचंद म्हणाले, “मी तिकिटाच्या रांगेत उभा राहिलो, खूप गर्दी होती. एवढी गर्दी होती की पोलिसही आले होते. लांबच लांब रांगेत उभं राहिल्यावर शेवटी माझा नंबर आला. मी तिकीटाच्या खिडकीवर जाऊन तिकीट काढण्यासाठी खिशात हात घातला तेव्हा माझे 10 रुपये चोरीला गेल्याचं मला समजलं. तेव्हा मी ठरवलं की मी ‘मुकद्दर का सिकंदर’ अजिबात पाहणार नाही आणि जरी पाहिला तर तो तुमच्यासोबत बघेन. त्यांचं हे बोलणे ऐकून अमिताभ बच्चन म्हणाले, “तुमचे शब्द ऐकून मी भावूक झालो आहे. या एपिसोडमध्ये अमिताब बच्चन यांनी दुलीचंद यांना 20 रुपये दिले. मी तुमचं कर्ज व्याजासह परत करतो असं म्हणत त्यांनी पैसे परत केले.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.