KBC 16: अमिताभ बच्चनच्या 1 कोटीच्या प्रश्नावर अडकला बंटी वडिवा, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

Kaun Banega Crorepati 16: बंटीने गेम सोडल्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेते मनू भाकर आणि अमन सेहरावत कौन बनेगा करोडपती सीझन 16 मध्ये हॉटसीटवर आले. खेळादरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांना अनेक मनोरंजक प्रश्न विचारले.

KBC 16: अमिताभ बच्चनच्या 1 कोटीच्या प्रश्नावर अडकला बंटी वडिवा, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?
KBC
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 1:41 PM

Kaun Banega Crorepati 16: बीग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा ‘ कौन बनेगा करोडपती’ च्या 16 व्या सीजनच्या माध्यमातून आले आहेत. 12 ऑगस्टपासून सुरु झालेल्या या शो मध्ये नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चन होस्ट करत आहे. नुकताच शोच्या एका भागात आदिवासी स्पर्धक बंटी वडिया याने 50 लाख रुपये जिंकले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्याच्यासमोर एक कोटीची रक्कम असणारा प्रश्न ठेवला. परंतु तो त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. एक कोटी ऐवजी 50 लाख घेऊन तो घरी परतला. अमिताभ बच्चन यांनी एक कोटीसाठी कोणता प्रश्न ठेवला होता अन् त्याचे उत्तर काय आहे…

बंटी वडिवाने शो जिवनात आलेले अनेक कठीण प्रसंग शेअर केले. त्याने सांगितले की, तो मुंबईत आला तेव्हा त्यांच्याकडे फक्त 260 रूपये होते. परंतु आता केबीसीमुळे तो लखपती झाला आहे. आता जिंकलेल्या या रक्कमेतून तो आपल्या वडिलांचे कर्ज फेडणार आहे.

हे सुद्धा वाचा

कौन बनेगा करोडपतीमध्ये बंटी वडिवा याच्यासमोर अमिताभ बच्चन यांनी आपल्या अंदाजात एक कोटी रुपयासाठी प्रश्न केला. बंटी 50 लाख रुपये जिंकला होता. तसेच त्याच्याजवळ कोणतीच लाइफलाइन नव्हती.

  • 1948 मध्ये बंगाली शिल्पकार चिंतामोनी कार यांनी त्यांच्या द स्टॅग नावाच्या कलाकृतीसाठी खालीलपैकी कोणता पुरस्कार जिंकला?
  • A. पायथागोरस पुरस्कार
  • B. नोबेल पुरस्कार
  • C. ऑलिम्पिक पदक
  • D. ऑस्कर अवार्ड

एक कोटींच्या प्रश्नावर बंटी वडिवाने खूप विचार केला. त्याचे मन वारंवार पर्याय A म्हणजेच पायथागोरस पुरस्काराकडे जात होते. मात्र, त्याला त्याच्या उत्तराची खात्री नव्हती आणि त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. बंटीने गेम सोडल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्याला उत्तर सांगितले. एक कोटीच्या प्रश्नाचे उत्तर पर्याय C म्हणजे ऑलिम्पिक पदक होते.

बंटीने गेम सोडल्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेते मनू भाकर आणि अमन सेहरावत कौन बनेगा करोडपती सीझन 16 मध्ये हॉटसीटवर आले. खेळादरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांना अनेक मनोरंजक प्रश्न विचारले.

लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.