KBC 13 | गीता सिंहना 7 कोटींवर पाणी सोडायला लावणारा प्रश्न अकबराशी संबंधित, तुम्हाला माहितेय का उत्तर?

‘महानायक’ अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती 13' या शोमध्ये स्पर्धक हिमानी बुंदेला आणि साहिल अहिरवार यांच्यानंतर मध्य प्रदेशच्या गीता सिंह गौर यांनी तिसरी करोडपती होण्याचा मान मिळवला आहे. एकूण 1 कोटीची रक्कम जिंकण्यासाठी त्यांनी 15 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. पण, गीता सिंह यांचा मोठ्या रकमेचा प्रश्न चुकला.

KBC 13 | गीता सिंहना 7 कोटींवर पाणी सोडायला लावणारा प्रश्न अकबराशी संबंधित, तुम्हाला माहितेय का उत्तर?
Geeta Singh-Amitabh Bachchan
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 2:33 PM

मुंबई : ‘महानायक’ अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती 13’ या शोमध्ये स्पर्धक हिमानी बुंदेला आणि साहिल अहिरवार यांच्यानंतर मध्य प्रदेशच्या गीता सिंह गौर यांनी तिसरी करोडपती होण्याचा मान मिळवला आहे. एकूण 1 कोटीची रक्कम जिंकण्यासाठी त्यांनी 15 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. पण, गीता सिंह यांचा मोठ्या रकमेचा प्रश्न चुकला.

या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर गीता यांना 7 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार होते. गीता या प्रश्नाचे उत्तर देऊ शकल्या नाहीत. याशिवाय त्यांनी आधीच सर्व लाईफ लाईन वापरल्या होत्या, त्यामुळे 7 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांना कोणतीही मदत देखील नव्हती. त्यामुळेच हा खेळ तिथेच सोडून जिंकलेले पैसे घेऊन पुढे न खेळण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

7 कोटींचा प्रश्न काय होता?

गीता यांना 7 कोटीं साठी विचारला गेलेला हा प्रश्न अकबराशी संबंधित होता. प्रश्न होता मुघल सम्राट अकबराच्या नातवाचा. अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारला होता की, ‘यातील कोणते नाव अकबरच्या तीन नातवंडांच्या नावांपैकी नाही, जे पाद्रींकडे सुपूर्द केल्यानंतर ख्रिश्चन बनले होते?’

ज्यामध्ये डॉन फेलिप, डॉन हेन्रिक, डॉन कार्लोस आणि डॉन फ्रान्सिस्को असे चार पर्याय देण्यात आले होते.

लाईफलाइन नसल्याने आणि प्रश्नाचे अचूक उत्तर न आल्याने गीता यांनी गेम सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतला.  त्यांनी खेळ सोडल्यानंतर अमिताभ यांनी  या प्रश्नाचे अचूक उत्तर सांगितले.

काय होते अचूक उत्तर?

अमिताभ यांनी सांगितले की, असे मानले जाते की, जहांगीर नास्तिक होता. त्याने आपला भाऊ दानियाल मिर्झाच्या तीन मुलांना येशूच्या याजकांच्या स्वाधीन केले. क्रॉस आणि पोर्तुगीज कपडे परिधान करून तिघांनीही आग्राभोवती परेड केली. त्यामुळे त्यांची नावेही बदलली – तहमुरास डॉन फेलिप, बायसुंगार डॉन कार्लोस आणि हुशांग डॉन हेनरिक झाले. मात्र, काही महिन्यांनंतर त्यांनी पुन्हा इस्लाम धर्म स्वीकारला. म्हणूनच योग्य उत्तर डॉन फ्रान्सिस्को आहे.

16 वर्षाचे अथक प्रयत्न

गीता सांगतात, ‘जेव्हापासून केबीसी प्रसारित झाला तेव्हापासून मी त्यात सहभागी होण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी मी दरवर्षी प्रयत्न करायचे. मी सतत गेली 16 ते 17 वर्षे प्रयत्न केले. जेव्हा कधी हरायचे, त्यावेळी मी खूप निराश व्हायचे. माझी मुलं मला हताश झालेलं बघायची आणि म्हणायची की, आई तू प्रयत्न करूच नकोस,  कारण जेव्हा तुझी निवड होत नाही, तेव्हा तुला दुःखी पाहून आम्हाला खूप वाईट वाटतं. पण आयुष्य निघून गेले तरी मी प्रयत्न करत राहीन असा निर्धार केला होता. पण आता अखेर मला यश मिळाले आहे.’

हेही वाचा :

मराठी चित्रपटांची मांदियाळी, हास्याची मेजवानी घेऊन येणारा ‘इमेल फिमेल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Satyamev Jayate 2 | ‘दिलबर’नंतर नोरा फतेहीचे ‘दिलरुबा’वर ठुमके, डान्स मुव्ह्स पाहून चाहतेही झाले घायाळ!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.