Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 13 | केबीसी 13च्या हॉटसीटवर बसणे रेल्वे अधिकाऱ्याला पडले महागात, 3 वर्षांसाठी वेतनवाढ रद्द, तर हाती चार्जशीट!

‘कौन बनेगा करोडपती 13’मध्ये (KBC 13) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या समोर हॉट सीटवर बसून रेल्वे अधिकारी देशबंधु पांडे (Deshbandhu Pandey) खूप आनंदी होते, पण घरी परतल्यानंतर त्यांना कशाला सामोरे जावे लागेल याची कल्पना देखील नव्हती.

KBC 13 | केबीसी 13च्या हॉटसीटवर बसणे रेल्वे अधिकाऱ्याला पडले महागात, 3 वर्षांसाठी वेतनवाढ रद्द, तर हाती चार्जशीट!
केबीसी 13
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 10:21 AM

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती 13’मध्ये (KBC 13) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या समोर हॉट सीटवर बसून रेल्वे अधिकारी देशबंधु पांडे (Deshbandhu Pandey) खूप आनंदी होते, पण घरी परतल्यानंतर त्यांना कशाला सामोरे जावे लागेल याची कल्पना देखील नव्हती. राजस्थानच्या कोटा रेल्वे विभागाच्या स्थानिक खरेदी विभागाचे कार्यालय अधीक्षक म्हणून तैनात देशबंधु पांडे यांना रेल्वे प्रशासनाने केवळ आरोपपत्र सोपवले नाही, तर त्यांच्या वेतनवाढीवर 3 वर्षांसाठी बंदीही घातली आहे. कोणतीही माहिती न देता आणि केबीसीमध्ये भाग घेण्यासाठी कार्यालयातून बेपत्ता झाल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

टीओआयच्या अहवालानुसार, आरोपपत्रात असे लिहिले आहे की, ‘तुम्ही रजा मंजूर केल्याशिवाय 9 ते 13 ऑगस्टपर्यंत बेपत्ता राहिलात, तुमची वृत्ती कामाकडे दुर्लक्ष दर्शवते. या प्रकरणात, आपल्यावर कारवाई झाली पाहिजे.’ देशबांधूने केबीसीमध्ये 3 लाख 20 हजार रुपये जिंकले होते. मात्र, ते मुंबईहून परतताच रेल्वे प्रशासनाने त्याला कठोर शिक्षा दिली असून, त्यांना आरोपपत्र सोपवण्यात आले आहे आणि पगारवाढही 3 वर्षांसाठी थांबवण्यात आली आहे. त्यांनी साग्भाग घेतलेला हा भाग 26 आणि 27 ऑगस्ट रोजी प्रसारित झाला आणि त्यांनी एकूण 10 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली.

देशबंधूंची कोणतीही प्रतिक्रिया नाही!

रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई केल्यापासून देशबंधू यांनी कोणतेही विधान केलेले नाही. देशबंधू लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त केबीसीला पोहोचले होते. कर्मचारी संघटनांनी रेल्वे प्रशासनाच्या वतीने अशा कारवाईला विरोध केला आहे. पश्चिम मध्य रेल्वे मजदूर संघाचे विभागीय सचिव खालिद यांनी म्हटले आहे की, रेल्वे प्रशासनाने पांडे यांच्याशी चांगले वर्तन केले नाही तर, त्यांच्याविरोधात खटला लढला जाईल.

ते म्हणाले की, हे आरोपपत्र 9 ऑगस्ट रोजी तयार करण्यात आले आहे, तर आरोपपत्र 13 ऑगस्टपर्यंत आधीच नमूद करण्यात आले आहे. 13 ऑगस्ट पर्यंत कर्मचारी येणार नाही, हे जेव्हा अधिकाऱ्यांना माहीत असेल तेव्हाच हे शक्य आहे. याचा अर्थ पांडेने 13 ऑगस्टपर्यंत रजा मागितली होती, जी त्याला देण्यात आली नव्हती. ते पुढे म्हणाले की, देशबंधू पांडे चार्जशीटमुळे इतके घाबरले आहेत की, ते रेल्वे प्रशासनाच्या विरोधात काहीही बोलायला तयार नाहीत. पांडे यांना 18 ऑगस्ट रोजी मुंबईहून परतल्यावर आरोपपत्र सोपवण्यात आले आणि त्यांच्याकडून उत्तरही मागवण्यात आले आहे.

आधीही रेल्वे कर्मचाऱ्यांनी घेतलाय सहभाग

कर्मचारी संघटनांनी सांगितले की, जर योग्य कारण असेल तर कर्मचाऱ्यांना सुट्टी दिलीच पाहिजे. KBC मध्ये सहभाग हे रेल्वेतून सुट्टी न मिळण्याचे कारण नाही. संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, केबीसीमध्ये रेल्वे कर्मचारी सहभागी होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेक अधिकारी आणि कर्मचारी केबीसीमध्ये सामील झाले आहेत. या सर्वांचा रेल्वेने आदर केला होता. परंतु, हे पहिले प्रकरण आहे जेव्हा कर्मचाऱ्याला सन्मानाऐवजी आरोपपत्र देण्यात आले आहे. या संपूर्ण मुद्द्यावर, कोटा रेल्वे विभागाचे वरिष्ठ व्यावसायिक व्यवस्थापक अजय कुमार पाल म्हणाले की, देशबंधू पांडे यांना विभागीय काम सांगितले गेले होते, त्यांनी ते काम केले नाही तसेच ते रजा न घेता गायब झाले. ते त्यांच्या कर्तव्यात निष्काळजीपणा करताना आढळले आहेत आणि या विभागीय कारवाईचा केबीसीशी काहीही संबंध नाही.

हेही वाचा :

कधीकाळी ‘वेटर’ म्हणून करायचे काम, आता बॉलिवूडवर राज्य करतायत ‘हे’ कलाकार!

जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, मनी लाँडरिंग प्रकरणात 5 तासापासून सुरु आहे ईडीची चौकशी

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.