KBC 13: फराह खाननं सांगितली आयांशला 16 कोटीच्या इंजेक्शनची गरज, अमिताभ बच्चन यांनी शो दरम्यान केलं गुप्तदान

फराह खान 17 महिन्यांच्या 'अयांश' नावाच्या मुलासाठी खेळत होती. अयांश एसएमए नावाच्या अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत गंभीर आजाराने ग्रस्त आहे म्हणजेच स्पाइनल मस्क्युलर एट्रोफी. (KBC 13: Farah Khan says Ayansh needs Rs 16 crore injection, Amitabh Bachchan made a secret donation during the show)

KBC 13: फराह खाननं सांगितली आयांशला 16 कोटीच्या इंजेक्शनची गरज, अमिताभ बच्चन यांनी शो दरम्यान केलं गुप्तदान
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 10:30 AM

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’चा 13 (kon banega crorepati) वा सीझन टीव्हीवर सुरू आहे. आपल्याला माहिती असेल की केबीसीच्या काही विशेष भागांमध्ये सेलिब्रिटी देखील सहभागी होतात. शोमध्ये पोहोचलेले सेलिब्रिटी स्वतः शोमधून जिंकलेले पैसे आपल्या स्वत:साठी वापरत नाहीत. त्याऐवजी ते पैसे ते दान करतात. दीपिका पदुकोण आणि फराह खान शुक्रवारी प्रसारित झालेल्या भागातील ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झाले होते. दीपिका स्वत: हून उभारलेल्या मेंटल हेल्थ फाउंडेशन ‘लव्ह, लिव्ह, लाफ’ साठी खेळत होती. त्याच वेळी, फराह खान 17 महिन्यांच्या ‘अयांश’ नावाच्या मुलासाठी खेळत होती. अयांश एसएमए नावाच्या अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत गंभीर आजाराने ग्रस्त आहे म्हणजेच स्पाइनल मस्क्युलर एट्रोफी. हा एक आजार आहे जो मुलांच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो. जर सोप्या भाषेत समजावून सांगायचं झालं तर या गुंतागुंतीच्या आजारानं ग्रस्त मुलाला हात आणि पाय हलवता येत नाहीत.

या आजारावर एकच उपचार आहे आणि तो उपचार खूप महाग आहे. Zolgensma नावाचं एक इंजेक्शन आहे. या रोगावर हे एकमेव औषध आहे. या एका इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये आहे. हे इंजेक्शन ‘चमत्कारिक औषध’ म्हणूनही ओळखले जाते. तर फराह ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये खेळत होती अयांशसाठी या इंजेक्शनसाठी पैसे गोळा करण्यासाठी. फराह यजमान सीटवर बसलेल्या अमिताभ बच्चन यांना म्हणाली, “झोल्जेन्स्मा नावाचं हे एक औषध आहे. हे जगातील सर्वात महागडं इंजेक्शन आहे. या एका इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये आहे. हे एकमेव औषध आहे, जे आयांशचे प्राण वाचवू शकते. आमची इच्छा आहे की अयांश दोन वर्षांचा होईपर्यंत आम्ही त्याच्यावर उपचार करू शकू. आम्हाला या मुलाला वाचवायचं आहे सर. ”

व्हिडीओमध्ये फराहचे शब्द आणि आयंशची आई ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी हॉट सीटवर बसलेल्या फराहला सांगितलं, “फराह, मला या मोहिमेत योगदान देण्यास देखील आवडेल. मी तुम्हाला रक्कम नंतर सांगेन. मला इथं पैशाबद्दल बोलायचं नाही.”

पाहा व्हिडीओ

अमिताभ बच्चन यांचे हे शब्द ऐकून फराह खान यांनी हात जोडून त्यांचे मनापासून आभार मानले. अमिताभ बच्चन यांनी तिथं उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आणि घरी टीव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांना पुढे येऊन या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केलं. या वर्षाच्या सुरुवातीला, अशाच एसएमएशी लढणाऱ्या मुलाचे प्रकरण समोर आले. लॉटरीमुळे नाशिकच्या एका मुलाला हे ‘चमत्कारिक औषध’ मोफत देण्यात आले.

संबंधित बातम्या

Kangana Ranaut Lookalike : कंगना रनौतची कार्बन कॉपी आहे ही ‘छोटी कंगना’, ‘थलायवी’ लूकमधील फोटो व्हायरल

पहिल्या भेटीच्या वेळीच सुशांत झाला होता नाराज, अंकिता लोखंडेने शेअर केल्या जुन्या आठवणी!

Happy Birthday Prachi Desai | शालेय दिवसांत शाहिद कपूरची फॅन होती प्राची देसाई, वाचा अभिनेत्रीबद्दल खास गोष्टी…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.