KBC 14 : या दिवसापासून सुरू होणार कौन बनेगा करोडपतीचे 14 वे सीझन, शूरवीरांसोबत साजरे होणार, ‘आझादी के गर्व का महापर्व’

यावेळी अमिताभ बच्चन सांगत आहेत की, 'KBC रविवार 7 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजल्यापासून 'आझादीचा महापर्व' साजरा होणार आहे. शोमध्ये सहभागी झाल्याबद्दल बोलताना आमिर खान म्हणताना दिसत आहे की, त्याच्यासाठी ही खूप भाग्याची गोष्ट आहे.

KBC 14 : या दिवसापासून सुरू होणार कौन बनेगा करोडपतीचे 14 वे सीझन, शूरवीरांसोबत साजरे होणार, 'आझादी के गर्व का महापर्व'
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 8:32 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या क्विझ रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती 14’ ची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली असून कौन बनेगा करोडपतीचे 14 वे (Kaun Banega Crorepati 14) सीझन रविवार, 7 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या शोच्या सुरुवातीच्या भागात देशातील अनेक शूरवीरांना आमंत्रित करण्यात आले आहे. सोनी टीव्हीकडून सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ शेअर करण्यात आलायं. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन म्हणत आहेत की, ‘आझादी के गर्व का महापर्व’ हा सीझन केबीसीमध्ये साजरा होणार आहे.

इथे पाहा सोनी टिव्हीने शेअर केलेला प्रोमो

सोनी टिव्हीने सोशल मीडियावर शेअर केला प्रोमो

KBC 14 च्या नव्या प्रोमोमध्ये आमिर खानसह कारगिल युद्धातील मेजर डीपी सिंग, महिला कर्नल मिताली मधुमिता, पद्मविभूषण मेरी कोम, पद्मश्री सुनील छेत्री हे सर्व पहिल्या महाभागात सहभागी होणार आहेत, हे आपण प्रोमोमध्ये पाहू शकतो. या स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावणारे हे सेलिब्रिटी अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तर देतीलच, पण त्यांच्या यशस्वी प्रवासातील काही अनुभवही प्रेक्षकांसोबत शेअर करतील.

आमिर खान म्हणाला ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट

यावेळी अमिताभ बच्चन सांगत आहेत की, ‘KBC रविवार 7 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजल्यापासून ‘आझादीचा महापर्व’ साजरा होणार आहे. शोमध्ये सहभागी झाल्याबद्दल बोलताना आमिर खान म्हणताना दिसत आहे की, त्याच्यासाठी ही खूप भाग्याची गोष्ट आहे. तर आपल्या अनुभवाबद्दल बोलताना मेजर डीपी सिंह म्हणाले की, अजूनही माझ्या शरीरात 73 छरे आहेत. मेजर डीपी सिंह यांनी कारगिल युद्धात महत्वाची भूमिका बजावली आहे.

स्पेशल एपिसोडबद्दल अमिताभ बच्चन म्हणाले की…

स्पेशल एपिसोडनंतर अमिताभ बच्चन सोमवार 8 ऑगस्टपासून खर्‍या अर्थाने KBC सुरू करणार आहेत. या शोचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. सोमवार ते गुरुवार अमिताभ बच्चन देशातील लोकांसोबत कौन बनेगा करोडपती खेळतील आणि शुक्रवारी शोमध्ये सेलिब्रिटींचे स्वागत केले जाईल. मात्र, या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार आहेत, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र, पुन्हा एकदा नव्या सीझनसोबत KBC ने जोरदार सुरूवात केलीयं.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.