KBC 14 | अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती 14’ चा प्रोमो व्हायरल, पाहा यंदा स्पेशल नेमके काय!
सध्या सोशल मीडियावर KBC 14 चा नवीन प्रोमो तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये दिसते आहे की, अमिताभ बच्चन हॉटसीटवर बसले आहेत. समोर बसलेल्या स्पर्धकाला अमिताभ बच्चन एक खास प्रश्न विचारतात. यापैकी कोणाकडे जीपीएस तंत्रज्ञान आहे. या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्पर्धकांना 4 पर्याय देण्यात आले होते.
मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध टीव्ही रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती‘ (KBC) च्या प्रत्येक नवीन सीझनची चाहते गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा ‘कौंन बनेगा करोडपती’ हा शो चाहत्यांसाठी सज्ज झाल्याचे एका प्रोमोमधून (Promo) पुढे येते आहे. केबीसीच्या 14 व्या हंगामाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. यंदा देखील कौन बनेगा करोडपतीचा 14 वा सीझन प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन होस्ट करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या होस्टिंगमुळेच हा शो अधिक खास बनतो. विशेष म्हणजे 14 व्या सीझनचे शूटिंगही सध्या सुरू आहे. नुकताच सोनी टीव्हीने KBC 14 चा नवीन प्रोमो रिलीज केला आहे. प्रोमोमध्ये बिग बी त्यांच्या खुर्चीवर बसले आहेत आणि त्यांच्यासोबत गुड्डी नावाच्या महिला देखील दिसत आहे.
पाहा कौन बनेगा करोडपतीचा प्रोमो
We all know that one person jo humein aisi unverified sansani khabrein sunata hai! Tag them in the comments and tell them that “Gyaan jahaan se mile bator lo, lekin pehle tatol lo.”#KBC2022 coming soon! Stay tuned!@SrBachchan pic.twitter.com/Y2DgAyP3MH
हे सुद्धा वाचा— sonytv (@SonyTV) June 11, 2022
सोशल मीडियावर KBC 14 चा प्रोमो तुफान व्हायरल
सध्या सोशल मीडियावर KBC 14 चा नवीन प्रोमो तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये दिसते आहे की, अमिताभ बच्चन हॉटसीटवर बसले आहेत. समोर बसलेल्या स्पर्धकाला अमिताभ बच्चन एक खास प्रश्न विचारतात. यापैकी कोणाकडे जीपीएस तंत्रज्ञान आहे. या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्पर्धकांना 4 पर्याय देण्यात आले होते. पहिला पर्याय होता A) टाइपरायटर, B) दूरदर्शन, C) उपग्रह, D) 2000 रुपयांची नोट. स्पर्धेक असलेल्या गुड्डी यांनी उत्तर दिले की, 2000 ची नोट निवडते. 2000 च्या नोटमध्ये जीपीएस तंत्रज्ञान आहे. त्यावर अमिताभ बच्चन गुड्डी यांना म्हणतात की, तुमचे उत्तर चुकीचे आहे.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शो टिव्हीवर येण्याची शक्यता
गुड्डी यांना आपले उत्तर चुकीचे आहे हे समजल्यावर त्यांना आर्श्चय होते. गुड्डी यांनी अमिताभ बच्चन यांना विचारले की तुम्ही खोटे बोलत आहात ना? पण अमिताभ बच्चन म्हणतात की, मी खोटे बोलत नाहीये. तुमचे उत्तर खरोखरच चुकले आहे. त्यानंतर गुड्डी पुढे म्हणतात की, मी टिव्हीवरील बातम्यांमध्ये ऐकले होते की, 2000 च्या नोटमध्ये जीपीएस तंत्रज्ञान आहे. त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले की, आपण जे ऐकतो त्यावर पूर्णपणे विश्वास न ठेवता आपण परत एका ते चेक करणे खूप गरजेचे आहे. कौन बनेगा करोडपतीची ऑन एअर डेट अजून जाहिर झालेली नाहीये. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा शो टिव्हीवर येण्याची शक्यता आहे.