Khatron Ke Khiladi 11 : बोलण्याच्या ओघात राखी सावंतकडून मोठी चूक, ‘खतरों के खिलाडी 11’च्या विजेत्याचे नाव केले जाहीर!

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) जेव्हा जेव्हा मीडिया फोटोग्राफर्सशी संवाद साधते, तेव्हा ती काहीतरी असे म्हणते जे नेहमी चर्चेत येते. खरं तर, भाजीपाला, जिम, कॉफी पिण्यासाठी किंवा इतर कारणांनी, जेव्हा जेव्हा राखी काही काळ घराबाहेर पडते, तेव्हा ती फोटोग्राफरशी नक्कीच संवाद साधते आणि त्यांच्याकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे देते.

Khatron Ke Khiladi 11 : बोलण्याच्या ओघात राखी सावंतकडून मोठी चूक, ‘खतरों के खिलाडी 11’च्या विजेत्याचे नाव केले जाहीर!
राखी सावंत
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 11:26 AM

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) जेव्हा जेव्हा मीडिया फोटोग्राफर्सशी संवाद साधते, तेव्हा ती काहीतरी असे म्हणते जे नेहमी चर्चेत येते. खरं तर, भाजीपाला, जिम, कॉफी पिण्यासाठी किंवा इतर कारणांनी, जेव्हा जेव्हा राखी काही काळ घराबाहेर पडते, तेव्हा ती फोटोग्राफरशी नक्कीच संवाद साधते आणि त्यांच्याकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे देते. अलीकडेच राखीने बोलण्याच्या ओघात असे म्हटले की, ‘खतरों के खिलाडी’चे चाहते आनंदी झाले आहेत (Khatron Ke Khiladi 11 Rakhi Sawant disclosed winner name by mistake).

वास्तविक, स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार एका छायाचित्रकाराने राखीला सांगितले की, ‘खतरों के खिलाडी’चे स्पर्धक केपटाऊनमधून भारतात परत आले आहेत. म्हणून ती म्हणाली की, सर्वांचे स्वागत आहे. राहुल वैद्य (Rahul Vaidya), श्वेता तिवारी, स्वागत… अर्जुन बिजलानी जिंकला, नाही का? आता खरं तर राखीने बोलण्याच्या ओघात या हंगामाच्या विजेत्यांची घोषणा केली असेच वाटते आहे. बरं आता अर्जुन खरंच विजेता आहे की नाही, हे येत्या काही काळात कळेल.

पण, नंतर राखी म्हणाली की, ती कधीच केपटाऊनमध्ये गेली नव्हती आणि त्यानंतर तिने फोटोग्राफर्सबरोबर आणखी गप्पा मारल्या.

राखीचे नवे गाणे प्रदर्शित

नुकतेच राखी सावंत हिचे ‘तेरे ड्रीम मी मेरी एंट्री’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे खूपच पसंत केले जात आहे. राखीने तिच्या जबरदस्त डान्स मूव्ह्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हे गाणे ज्योतिका टांगरी यांनी गायले आहे आणि परीक्षितने रॅप केले आहे. गौर दास दासगुप्ता याने संगीत दिले असून, विश्वास राणे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.

पाहा राखीचे नवे गाणे

काही काळापूर्वी राखी सावंत इंडियन आयडॉल 12 या शोमध्ये दिसली होती. राखीने शोच्या सेटवरून व्हिडीओ शेअर केला आणि म्हणाली, ‘आज मी कुठे आहे ते बघा. इंडियन आयडॉलच्या सेटवर. मी खूप उत्सुक आहे. इंडियन आयडॉलच्या सेटवर खूप मजा केली. लवकरच माझा एपिसोड येत आहे. तर तुम्ही सर्व तयार आहात ना?  लवकरच तुमच्या भेटीला येतोय धमाका घेऊन…

(Khatron Ke Khiladi 11 Rakhi Sawant disclosed winner name by mistake)

हेही वाचा :

22 वर्षांपूर्वी आमीर खानच्या चित्रपटातून पदार्पण, कपिल शर्माची ‘पत्नी’ बनून सुमोना गाजवतेय छोटा पडदा!

करण मेहरा आणि निशा रावलच्या नात्यातील दरीला 2015 पासूनच सुरुवात, घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं प्रकरण!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.