Khoya Khoya Chand | पहिलीच फिल्म हिट ठरल्यानंतरही करिअर फ्लॉप झाले! पाहा ‘टार्झन’ फेम वत्सल शेठ आता काय करतो?

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आले, ज्यांनी पहिल्याच चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळवली, पण त्यानंतर त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. यांपैकीच एक होता अभिनेता वत्सल शेठ (Vatsal Sheth).

Khoya Khoya Chand | पहिलीच फिल्म हिट ठरल्यानंतरही करिअर फ्लॉप झाले! पाहा ‘टार्झन’ फेम वत्सल शेठ आता काय करतो?
वत्सल शेठ
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 9:05 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आले, ज्यांनी पहिल्याच चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळवली, पण त्यानंतर त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. यांपैकीच एक होता अभिनेता वत्सल शेठ (Vatsal Sheth). वत्सल सेठ याचा जन्म मुंबईतच झाला आणि त्याचे शिक्षणही मुंबईतच झाले. वत्सलने 1996 मध्ये सोनी टेलिव्हिजनच्या ‘जस्ट मोहब्बत’ या मालिकेतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. वत्सलचा पहिला बॉलिवूड चित्रपट हिट ठरला. पण त्यानंतरही आज तो दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करत आहे.

सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. पत्नी इशिता दत्तासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून तो अनेकदा त्याच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहतो. 1996 ते 2000 दरम्यान ‘जस्ट मोहब्बत’ मध्ये काम केल्यानंतर वत्सल थेट 2004 मध्ये ‘टार्झन : द वंडर कार’ या चित्रपटात दिसला. या चित्रपटामुळे वत्सल सेठ पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला. मुख्य अभिनेता म्हणून वत्सलचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.

अभिनयात नव्हता रस!

मात्र, वत्सलला अभिनय जगातात कधीच प्रवेश करायचा नव्हता. त्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे होते. वत्सलला एका मित्राच्या आईने सल्ला दिला की, त्याने ऑडिशन दिली पाहिजे आणि ते ऐकून तो उठून ऑडिशनला गेला. त्या सीरियलमध्ये एका लहान मुलाची गरज होती आणि त्यात लगेचच त्याची निवड झाली.

चित्रपटाचे यश पाहून वत्सलचा चित्रपट प्रवास यशस्वी होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र,  चित्रपट हिट झाला पण वत्सलच्या कारकिर्दीला जास्त उंची मिळू शकली नाही. या चित्रपटात वत्सलसोबत अभिनेत्री आयशा टाकिया दिसली होती. दोघांची जोडीही खूप पसंत केली गेली होती. अभिनेता अजय देवगण चित्रपटात वत्सलच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होता. ‘टार्झन द वंडर कार’ चित्रपटानंतर वत्सलने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. पण, वत्सल सेठ मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरला. त्यानंतर तो पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला.

छोटा पडदा गाजवला

2014 मध्ये त्याने छोट्या पडद्यावरील मालिका ‘एक हसीना थी’मध्ये काम केले. वत्सल या सिरीयलमधु घरोघरी पोहोचला होता. ही मालिका देखील हिट झाली होती. या मालिकेत वत्सल सोबत अभिनेत्री संजीदा शेख मुख्य भूमिकेत होती. वत्सल जी जादू मोठ्या पडद्यावर दाखवू शकला नाही, ती त्याने छोट्या पडद्यावर दाखवली. वत्सल छोट्या पडद्यावर चांगलाच प्रसिद्ध आहे. यानंतर वत्सल सेठ 2016मध्ये ‘रिश्तों का सौदागर बाजीगर’ या मालिकेतही झळकला.

या मालिकेत वत्सलसोबत त्याची पत्नी इशिता दत्ताही होती. मात्र, या मालिकेदरम्यान दोघांचेही लग्न झाले नव्हते. या मालिकेदरम्यान वत्सल सेठ आणि इशिता एकमेकांच्या जवळ आले होते. वत्सलने 2017 मध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्ताशी गुपचूप लग्न केले. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2014 साली त्याने सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात एक छोटी भूमिका केली होती. लॉकडाऊन दरम्यान वत्सल आणि इशिता दोन म्युझिक व्हिडीओमध्ये दिसले होते.

हेही वाचा :

Hum Aapke Hai Kaun | एव्हरग्रीन चित्रपटाची 27 वर्षे, जाणून घ्या ‘हम आपके हैं कौन’च्या खास गोष्टी

पतीने गळा पकडला, शिव्या देखील दिल्या! ‘बागबान’ फेम अभिनेत्री आरजू गोवित्रीकरने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.