मुंबई : मुलगी झाली हो या मालिकेतील वादानंतर किरण माने यांचे नाव चर्चेत आले. मुलगी झाली हो या मालिकेतून बाहेरचा रस्ता अचानकपणे किरण माने (Kiran Mane) यांना दाखवण्यात आला. बिग बाॅस मराठीमध्येही किरण माने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे टाॅप 3 पर्यंत पोहचण्यात त्यांना यश मिळाले. बिग बाॅस (Bigg Boss) मराठीमध्येही त्यांनी जबरदस्त असा गेम खेळला. मुलगी झाली हो या मालिकेच्या निर्मात्यांवर किरण माने यांनी गंभीर आरोप केले होते. अनेकांनी परत एकदा किरण माने यांना मुलगी झाली हो या मालिकेत घेण्याची विनंतीही केली. हा वाद खूप जास्त वाढला होता. अनेक राजकिय पक्षांच्या लोकांनीही या वादात उडी घेतली होती.
8 मार्च महिला दिनानिमित्त आज किरण माने यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. महिला दिनानिमित्त संपूर्ण राज्यात अनेक कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनीच महिला दिनानिमित्त महिलांना खास पध्दतीने शुभेच्छा दिल्या आहेत. किरण माने यांनी महिला दिनानिमित्त लांबलचक पोस्ट लिहिली आहे.
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ती गाढ झोपेत असते. अचानक कानात मोबाईल आरवू लागतो. झोपेतच ती वैतागते. डोळे तसेच मिटून, हाताने मोबाईल चाचपून अलार्म ऑफ करणार, तेवढ्यात तिचा मेंदू ऑन होऊन तिला वाॅर्निंग देतो, “अगं ए..उठ. आज रेवाला सकाळची शाळाय… ती ताडकन उठून बसते… दिवसभरातल्या अनेक कामांची लिस्ट तिच्या डोक्यात स्क्रोल होऊ लागते…
एका ‘वर्किंग वूमनचा दिवस भल्या पहाटे सुरू होतो, असेही किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. क्षेत्र कुठलंही असो, दिनचर्या हीच असते…आपलं कौटुंबिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य याची सांगड घालताना वर्किंग विमेनना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचा त्याग म्हणजे ‘स्वत:साठीचा वेळ’ ! काम करणारे पुरूष आरामासाठी शनिवार रविवारची वाट पहातात. पण वर्किंग वुमनने हे सुट्टीचे दिवसही घरासाठी वाहिलेले असतात.
किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये वर्किंग विमेनबद्दल लिहिले आहे. इतकेच नाही तर पोस्टच्या शेवटी त्यांनी महिला दिनानिमित्त घर सांभाळून नोकरी, व्यवसाय करणार्या सगळ्या सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम देखील केलाय. आता किरण माने यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांना किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट प्रचंड आवडली देखील आहे. चाहते आता या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. आता किरण माने यांच्या या पोस्टची चर्चा रंगली आहे.