हिंदी, मराठी, तेलुगु, बिहारी…सयाजी शिंदे वेगवेगळ्या भाषा कशा शिकतात? ऐका त्यांचा कानमंत्र…

आता या मंचावर ‘कर्मवीर विशेष’ या भागात अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) आणि अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक किस्से प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत.

हिंदी, मराठी, तेलुगु, बिहारी...सयाजी शिंदे वेगवेगळ्या भाषा कशा शिकतात? ऐका त्यांचा कानमंत्र...
Sayaji Shinde
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 11:57 AM

मुंबई : छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रसिद्ध कार्यक्रमाचा मराठी अवतार म्हणजे ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Karodpati). 2019ला या कार्यक्रमाचे पहिले पर्व प्रदर्शित झाल्यावर गेल्यावर्षी कोरोनामुळे या कार्यक्रमाला विश्राम घ्यावा लागला होता. परंतु, आता कोरोना परिसथिती थोडी आटोक्यात आल्यावर आता दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे सूत्रसंचालन ‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांनी केले होते व आता दुसऱ्या भागासाठी जेष्ठ अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांची वर्णी लागलीय. मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. आता या मंचावर ‘कर्मवीर विशेष’ या भागात अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) आणि अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक किस्से प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत.

सयाजी शिंदे वेगवेगळ्या भाषा कशा शिकतात?

यावेळी मंचावर अभिनेते आणि या कार्यक्रमाचे होस्ट सचिन खेडेकर म्हणाले की, ‘मला आठवत तेव्हा सयाजीचे 60-70 तेलुगू चित्रपट झाले होते. हा माणूस ही भाषा कशी बोलतो किंवा इतर भाषा कशा बोलतो, याचं मला खूप आश्चर्य वाटायचं…’ यावेळी सयाजी शिंदे यांनी त्यांच्या या कौशल्यामागचा इतिहास सांगितला.

कशा लक्षात राहतात भाषा?

यावेळी सयाजी शिंदे म्हणतात की, एका नटला दिवसातून किमान बारा तास काम करावं लागतं. त्यात असे काही समान शब्द असतात जे सतत येत असतात. अशावेळी त्यांनी प्रत्येक भासते सतत येणाऱ्या 100 शब्दांची त्यांच्या अर्थासहित नोंद करून ठेवली आहे. अर्थात ते जिथे जातात तिथल्या बोली भाषेचे निरीक्षण करतात आणि त्यातील शब्द त्यांच्या अर्थासहित एका वहीत लिहून काढतात. ते म्हणतात की, हेच शब्द जोडून त्यांची वाक्य तयार होतात. अशा प्रकारे ते सगळ्या भाषा आत्मसात करतात.

‘झाडांचं शतक आणि शतकांची झाडं’

या मंचावर दोन्ही दिग्गज कलाकारांनी वृक्षसंवर्धनाचं महत्त्व उलगडून सांगितलं आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष पाहिलेल्या आजी-आजोबांच्या हातून झाड लावून ते पुढच्या 20-30 वर्षांनी त्यांच्या नातवाला त्याची सावली मिळणं, हे घडलं पाहिजे असे देवराईचे शिल्पकार अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले. तर, ‘झाडांचे गुण गाऊ, झाडांचे गुण घेऊ’ असं म्हणत अभिनेता मनोज बाजपेयींनी देखील त्यांना पाठींबा दर्शवला आहे.

सयाजी शिंदे यांची वृक्षारोपण मोहीम

पर्यावरण दिनाच्या औचित्याने अनेकांचं निसर्गप्रेम जागं होतं. या दिवशी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाते. पण पुढे त्याकडे दुर्लक्ष होतं आणि लावलेली रोपंही जळून जाता. मात्र, सह्याद्री देवराई या संस्थेनं झाडांच्या संवर्धनाचं काम नियमीतपणे करण्याचा वसाच घेतला आहे. लोकांनीही या कार्यात जास्तीत जास्त सहभागी व्हावं यासाठी सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी अशा कार्यक्रमात अर्थदान, श्रमदान, वृक्षदान आणि बीजदानाच्या स्वरुपात अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत. या पर्यायांच्या माध्यमातून लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन ते करतात.

हेही वाचा :

चित्रपटातील ‘तो’ न्यूड सीन पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल, ट्विटरवर ट्रेंड होतंय #BoycottRadhikaApte

 नकळतपणे कार्तिक सांभाळतोय त्याच्या मुलीला…, निर्माण होईल का जिव्हाळा?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.