अशी स्तुती सचिन खेडेकरांची तोंडावर कुणीच केली नसेल, इन्सपेक्टर बाई म्हणाल्या, मी आल्यापासून तुम्हालाच बघतेय, बघा खेडेकरांची प्रतिक्रिया
या प्रोमोमध्ये मंगला हरडे या सचिन खेडेकर यांचं तोंड भरुन कौतुक करताना दिसत आहेत. (Kon Honar Crorepati: 'You look more beautiful in real than camera', compliments to Sachin Khedkar from Nagpur Police Sub-Inspector)
मुंबई : ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये एक वेगळी उत्सुकता असते. या कार्यक्रमाची लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आतुरतेनं वाट पाहत असतात. एवढंच नाही तर या कार्यक्रमात येणाऱ्या स्पर्धकांविषयीसुद्धा चाहत्यांमध्ये एक वेगळी उत्सुकता असते. तर आता कोण होणार करोडपतीच्या मंचावर येणार आहेत नागपूरच्या मंगला हरडे.
नुकतंच प्रोमो आऊट
नुकतंच रिलीज करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसतं आहे की पुढील भागांमध्ये सचिन खेडेकर यांच्यासोबत हा करोडपतीचा खेळ खेळण्यासाठी नागपुरच्या मंगला हरडे हॉटसीटवर असणार आहेत. मंगला हरडे या नागपुरच्या क्राईम ब्रँचमध्ये पोलीस सब इंस्पेक्टर आहेत. या करोडपतीच्या खेळादरम्यान अनेक गप्पा गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे या प्रोमोनं चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. नेहमीच हा खेळ रंगत असताना अनेक गप्पा होत असतात. स्पर्धकांचं कौतुक होतं तसंच काहीसं यावेळीसुद्धा घडलं आहे.
‘तुम्ही कॅमेऱ्यापेक्षा रिअलमध्ये जास्त सुंदर दिसता’
तर या प्रोमोमध्ये मंगला हरडे या सचिन खेडेकरांचं तोंड भरुन कौतुक करताना दिसत आहेत. त्या म्हणाल्या, ‘आम्हाला तुम्हाला लवकरच पोलिसांच्या भूमिकेत बघायचं आहे. सोबतच तुम्ही कॅमेऱ्यापेक्षा रिअलमध्ये जास्त सुंदर दिसता मला. मी आल्यापासून तुम्हालाच बघत होते पहिल्या दिवसापासून, माझं मनच डायव्हर्ट होत होतं. माझ्या ताईनं मला रागावलं की तु त्यांच्याकडे बघु नकोस तुझं मन डायव्हर्ट होतंय. त्यामुळे आज आल्यापासून मी तुमच्याकडे पाहिलंच नाही..त्यामुळे आता तुम्हाला पोटभर बघते आहे’ मंगला यांच्या या वाक्यावरुन सेटवर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसतं.
पाहा प्रोमो
View this post on Instagram
कोण होणार करोडपती
‘कोण होणार करोडपती’ सोनी मराठी वाहिनीवर सोम.-शनि रात्री 9 वा. पाहायला मिळणार आहे. कोण होईल मराठी करोडपती हा एक गेम शो आहे. सोनी हिंदी वाहिनीवर कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमुळे याचं मराठीमध्ये रुपांतर करण्यात आलं. याचे तीन पर्वे कलर्स मराठी वाहिनी आणि नंतरची पर्वे सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सचिन खेडेकर, स्वप्नील जोशी आणि नागराज मंजुळे यांनी विविध पर्वात सूत्रसंचालन केले होते. ही मालिका 2013 रोजी प्रसारित झाली होती.
संबंधित बातम्या
Birthday Special : प्रेम, काम आणि कुटुंब… कसं आहे काम्या पंजाबीचं आयुष्य?, पाहा खास फोटो