Krushna Abhishek | कृष्णा अभिषेक याने दिले एका शब्दात उत्तर, कपिल शर्माच्या शोबद्दल महत्वाचे अपडेट

कृष्णा अभिषेक हा सतत चर्चेत आहे. मामा गोविंदा याच्यासोबत कृष्णा अभिषेक याचे काहीतरी बिनसले आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये गोविंदाने कृष्णा अभिषेक याच्याबद्दल मोठे भाष्य केले होते. त्यानंतर यावर कृष्णा अभिषेक हिनेही स्पष्टीकरण देत हे सर्व प्रेम असल्याचे म्हटले होते.

Krushna Abhishek | कृष्णा अभिषेक याने दिले एका शब्दात उत्तर, कपिल शर्माच्या शोबद्दल महत्वाचे अपडेट
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 8:05 PM

मुंबई : कपिल शर्मा हा गेल्या कित्येक वर्षांपासून त्याचा शो द कपिल शर्मा याच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्या या शोमध्ये बाॅलिवूडचे अनेक कलाकार हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येतात. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या सेल्फी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचला होता. यावेळी त्याने काही मोठे खुलासे देखील केले. नुकताच सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेला होता. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टिम देखील उपस्थित होती.

फक्त काॅमेडीच्या माध्यमातूनच नाही तर गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा हा त्याच्या अभिनयाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. कपिल शर्मा याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, कपिल शर्मा याच्या या चित्रपटाला काही धमाका करण्यात यश मिळाले नाही. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.

कपिल शर्मा याच्या शोमधून गेल्या कित्येक वर्षांपासून कृष्णा अभिषेक हा गायब आहे. प्रेक्षक कृष्णा अभिषेक याला मिस करतात. सतत कृष्णा अभिषेक याच्या पुनरागमनाची वाट चाहते बघत आहेत. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, कृष्णा अभिषेक हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये पुनरागमन लवकरच करणार आहे. यानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले.

कपिल शर्माच्या शोमधील पुनरागमनावर आता कृष्णा अभिषेक याने मोठे भाष्य केले आहे. कृष्णा अभिषेक म्हणाला की, मला शोच्या निर्मात्यांचा फोन आला होता. मात्र, परत एकदा पैशांमुळे सर्वकाही थांबले आहे. पण असे नाही की, मी कधी कपिल शर्मा याच्या शोमध्ये दिसणार नाही. या सीजनमध्ये तरी मी नसणार हे नक्की आहे, असा मोठा खुलासा कृष्णा अभिषेक याने केला.

पुढे कृष्णा अभिषेक याला कपिल शर्मा याचा शो बंद होणार आहे का? यावर प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना कृष्णा अभिषेक म्हणाला की, मी देखील अशी चर्चा ऐकली आहे पण मी खरोखर सांगतो की, याबद्दल मला काहीच माहिती नाहीये. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सुरू असून कपिल शर्मा याच्या शो बंद होणार आहे. मात्र, यावर अजून कपिल शर्मा याने काहीही भाष्य केले नाहीये.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.