Mi Honar Superstar : स्टार प्रवाहच्या ‘मी होणार सुपरस्टार’ कार्यक्रमातील लायन्स ग्रुपने पटकावलं कांस्यपदक, तर मायनस थ्री ग्रुप दहाव्या स्थानी

मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा हा कार्यक्रम म्हणजे अनेकांसाठी संधी होती, संकट काळानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी. याच स्पर्धेतील दोन स्पर्धकांनी अख्ख्या भारताचं लक्ष्य वेधून घेतलं. (Lions Group wins bronze from Star Pravah's 'Mi Honar Superstar', while Minus Three Group ranked 10th)

Mi Honar Superstar : स्टार प्रवाहच्या 'मी होणार सुपरस्टार' कार्यक्रमातील लायन्स ग्रुपने पटकावलं कांस्यपदक, तर मायनस थ्री ग्रुप दहाव्या स्थानी
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 3:59 PM

मुंबई : महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘मी होणार सुपरस्टार’ (Mi Honar Superstar) या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. जबरदस्त टॅलेण्ट, या टॅलेण्टला पारखणारा सुपरजज अंकुश चौधरी, कॅप्टन्स कृती महेश आणि वैभव घुगे आणि संस्कृती बालगुडेचं दिमखदार सुत्रसंचालन यामुळे या कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. या कार्यक्रमातील लायन्स आणि मायनस थ्री या दोन्ही ग्रुपनी वर्ल्ड हिप हॉप स्पर्धेत आपली चमक दाखवली आहे. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या हिप हॉप स्पर्धेत लायन्स ग्रुपने कांस्यपदक पटकावलं आहे. तर मायनस थ्री ग्रुपही दहावं स्थान गाठण्यात यशस्वी झाला आहे. तमाम भारतीयांसाठी आणि हिप हॉप प्रेमींसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

4 सर्वोत्तम स्पर्धकांनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी

प्रत्येक प्रतिभावान कलाकाराला त्याच्या कलेसाठी हवं असतं एक हक्काचं व्यासपीठ. ज्याद्वारे तो त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. डान्सचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांसाठी असाच एक मंच उभारला तो स्टार प्रवाह वाहिनीने. स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सुरू झाला एक प्रवास तो म्हणजे मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या 60 स्पर्धकांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्यातील 4 सर्वोत्तम स्पर्धकांनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी. ज्याचा विजेता ठरेल सुपरस्टार.

मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा हा कार्यक्रम म्हणजे अनेकांसाठी संधी होती, संकट काळानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी. याच स्पर्धेतील दोन स्पर्धकांनी अख्ख्या भारताचं लक्ष्य वेधून घेतलं. एक म्हणजे द लायन्स ग्रुप आणि एक म्हणजे मायनस 3 ग्रुप. गेली काही वर्षे हे दोन्ही संघ हिप हॉप ही डान्स स्टाईल परफॉर्म करत आहेत. वर्ल्ड हिप हॉप मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करावे या विचारांनी त्यांनी प्रयत्न सुरु ठेवला. त्यांचे लक्ष्य होते अमेरिकेत होणारी वर्ल्ड हिप हॉप स्पर्धा जिंकणं. ही स्पर्धा हिप हॉप करणाऱ्या कलाकारांसाठी अत्यंत मानाची समजली जाते. याआधी लायन्स आणि मायनस यांनी भारतात होणाऱ्या हिप हॉप स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलं असल्यामुळे त्यांना वर्ल्ड हिप हॉपमध्ये आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. लायन्स हा 7 जणांचा ग्रुप आहे. त्यांनी अडल्ट क्रु या प्रकारात सादरीकरण केलं. तर मायनस 3 यांनी मिनी क्रु या विभागात भाग घेतला. दरवर्षी ही स्पर्धा अमेरिकेत होते पण यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. या स्पर्धेत 170 देशांनी एण्ट्री पाठवल्या होत्या. अटीतटीच्या या स्पर्धेत लायन्स आणि मायनस 3 या दोन्ही संघाची निवड होणं हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

लासन्सच्या टीमचा नृत्यदिग्दर्शक बालाजी म्हणाला, ‘मागील वर्षी आपण या स्पर्धेत 52 व्या क्रमांकावर होतो. ही गोष्ट त्याच्या मनाला लागली. भारताला तिथून पहिल्या क्रमांकावर आणणे हे आमचे स्वप्न होते. कांस्य पदक आणि रौप्य पदक यांचे एकूण गुण सारखेच होते. तर गोल्ड मेडल मिळालेल्या संघात आणि लायन्सच्या परफॉर्मन्स मध्ये फक्त 0.12 इतका छोटा फरक होता. पुढच्या वर्षी सुवर्णपदक आणायचे आमचे ध्येय आहे असे बालाजी याने सांगितले.’

मायनस 3 मधील सुजिन म्हणाला, ‘पहिल्या प्रयत्नामध्ये आम्ही टॉप 10 मध्ये येणं ही देखील एक खूप मोठी गोष्ट आहे. पुढच्या वर्षीच्या तयारीसाठी ही गोष्ट प्रेरणा देणारी आहे.’

आपल्या नृत्यामुळे जग जिंकणारे कलाकार मी होणार सुपरस्टारच्या मंचावर आहेत याचा सार्थ अभिमान स्टार प्रवाह वाहिनीला आहे. मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा या स्पर्धेत कोणता कलाकार सुपरस्टार होण्याचा मान मिळवतोय हे लवकरच कळेल. त्यासाठी पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवर.

संबंधित बातम्या

रंगभूमीचा पडदा उघडताच पहिला नाट्य प्रयोग वांद्र्यात रंगणार, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ने तिसरी घंटा वाजणार!

Death Anniversary | धार्मिक चित्रपट करणं निरुपा रॉय यांच्या करिअरला ठरलं बाधक, पाहा कशी झाली होती बॉलिवूडमध्ये एंट्री…

Aryan Khan bail hearing | आर्यनच्या जामिनासाठी मोठी खटपट, पुन्हा एकदा होणार जामीन अर्जावर सुनावणी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.