Bigg Boss 15 | ‘बिग बॉस 15’च्या घरात लीपलॉक सीन, मायशा-ईशानची लव्हस्टोरीने ओलांडल्या मर्यादा!

बिग बॉस 15च्या पहिल्या आठवड्यात या घरात एक नवा प्रकार घडला आहे. या हंगामात पहिल्यांदाच पहिल्या आठवड्यात सर्व स्पर्धकांना एकत्र नामांकित केले गेले. याशिवाय, एकाच आठवड्यात जबरदस्त मारामारी आणि अनेक प्रेमकथा दिसली असताना देखील हे प्रथमच घडले आहे.

Bigg Boss 15 | ‘बिग बॉस 15’च्या घरात लीपलॉक सीन, मायशा-ईशानची लव्हस्टोरीने ओलांडल्या मर्यादा!
Ishan_meisha
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 2:26 PM

मुंबई : बिग बॉस 15च्या पहिल्या आठवड्यात या घरात एक नवा प्रकार घडला आहे. या हंगामात पहिल्यांदाच पहिल्या आठवड्यात सर्व स्पर्धकांना एकत्र नामांकित केले गेले. याशिवाय, एकाच आठवड्यात जबरदस्त मारामारी आणि अनेक प्रेमकथा दिसली असताना देखील हे प्रथमच घडले आहे. परंतु, जिथे लव्हस्टोरीची चर्चा आहे, या प्रकरणातही हा शो सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे.

‘बिग बॉस 15’च्या घरातील स्पर्धक मायशा अय्यर आणि ईशान सहगल बरेच चर्चेत आहेत. घराचे दिवे प्रज्वलित असोत किंवा बुजलेले असोत, हे जोडपे प्रत्येक वेळी एकमेकांना चिकटलेले दिसतात. मायशा आणि ईशान अनेक वेळा एकमेकांसोबत लिपलॉक करताना दिसले आहेत आणि अलीकडच्या एपिसोडमध्ये ते एकमेकांशी अनेक वेळा इंटीमेट होताना दिसतील.

बेड देखील शेअर करतात…

याशिवाय ईशान आणि मायाशा एकमेकांसोबत बेड शेअर करताना देखील दिसतात. जोडप्याने एकमेकांना मिठी मारल्याची आणि एकमेकांसोबत इंटीमेट होतानाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. टीव्हीवर रात्री उशिरा प्रसारित होणाऱ्या बिग बॉसमध्ये अशा गोष्टी सतत टीव्हीवर दाखवल्या जात आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

ईशान आणि मायशाच्या कृत्यावर चाहत्यांचा राग

सध्या बिग बॉसमध्ये ईशान सहगल आणि मायशा अय्यरच्या प्रेमाचे क्षण पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या सीझनमध्ये इतक्या लवकर कोणतीही जोडी एकमेकांच्या जवळ आली नव्हती, त्यमुळे चाहत्यांना असे वाटत आहे की, दोघेही हे फक्त टीआरपीसाठी करत आहेत. अलीकडेच, एका व्हिडीओमध्ये ईशान मायशाला किस करताना दिसला, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यही थोडे अस्वस्थ दिसले होते, तर सोशल मीडियावर देखील त्यांना ट्रोल करण्यात आले.

काय म्हणाले चाहते?

एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘बिग बॉस 15 तुम्ही एक लव बेट बनले आहात. हे दोघे कसे दिसतात? माझी आई आणि मी एकत्र टीव्ही पाहत होतो आणि मला समोर आल्यावर लगेच चॅनेल बदलावे लागले. हा प्रोमो पाहिल्यानंतर मला अतिशय खराब वाटले आहे. अशी दृश्ये दाखवू नका’. एकाने लिहिले की, ‘आम्ही या अश्लील गोष्टी बघायला आलेलो नाही. हा एक कौटुंबिक शो आहे, म्हणून हे सर्व बघून वाईट वाटते. एका आठवड्यात, दोघेही एकमेकांच्या इतक्या जवळ आले आहेत’.

दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, ‘हे स्पष्ट आहे की दोन्ही ड्रामा आहे. पहिल्या आठवड्यातच हा गोंधळ होणे आवश्यक आहे.’ एकाने लिहिले, ‘ईशानच्या आत इम्रान हाश्मीचा आत्मा आला आहे असे दिसते, भाऊ हा एक कौटुंबिक शो आहे, नाही का?’. चाहत्यांना सोशल मीडियावर ईशान आणि मायशाची जवळीक आवडत नाहीय आणि दोघांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.

प्रेक्षकांना रुचत नाहीये प्रेमकथा!

ईशान सहगल आणि मायशा अय्यर शोच्या पहिल्याच आठवड्यात एकमेकांच्या जवळ येत असल्याचे दिसत आहे. अगदी दोघांनीही एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले आहे. एवढेच नाही तर पहिल्याच भागात ईशानने मायशाला डेट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मायशानेही इशानचा प्रस्ताव स्वीकारला आणि डेटिंगला ‘हो’ म्हटले. बिग बॉसच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही स्पर्धकाने इतक्या वेगाने प्रेम व्यक्त केले नव्हते. अर्थात प्रेक्षक सुद्धा ही गोष्ट पचवू शकत नाहीत.

शोमधून बाहेर पडलेल्या साहिल श्रॉफने सांगितले की, ‘ईशान आणि मायशावर खेळाचा खूप दबाव आहे. दोघांनाही चांगले दिसायचे आहे. घरात राहत असताना दोघांचे प्रेम अस्सल वाटत होते. पण हे प्रेम कल्पनारम्य किंवा परीकथा आहे. साहिलच्या मते, दोघेही एकमेकांसोबत सर्व वेळ घालवत आहेत. कदाचित लोकांना ही प्रेमकथा आवडेल. पण हे फार काळ टिकणारे प्रेम आहे असे वाटत नाही.

हेही वाचा :

Gadar 2 | सनी देओल जुन्याच कलाकारांसोबत आपली प्रेमकथा पुढे नेणार, जाणून घ्या ‘गदर 2’ कधी होणार रिलीज?

Garbe Ki Raat : राहुल वैद्य अडचणीत, ‘गरबे की रात’ या नवीन गाण्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.