Women’s Day :”कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा”, महिला दिनानिमित्त मधुराणीचा महिलांना सल्ला
आज महिला दिन आहे त्यानिमित्त सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्या महिलांना बळ देणारी अरुंधतीचं म्हणणं ऐकणं तर गरजेचंच आहे. तुमच्या सगळ्यांची लाडकी अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने महिलांना एक खास सल्ला दिलाय.
मुंबई : आज महिला दिन आहे त्यानिमित्त सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्या महिलांना बळ देणारी अरुंधतीचं म्हणणं ऐकणं तर गरजेचंच आहे. तुमच्या सगळ्यांची लाडकी अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने महिलांना एक खास सल्ला दिलाय. तो तुम्हालाही उपयोगी पडेल. महिला दिनानिमित्त आम्ही मधुराणी प्रभुलकरसोबत खास बातचित केली. तेव्हा तिने महिलांना जगण्याचा मूलमंत्र दिला आहे. मधुराणी म्हणाली की “कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा”
मधुराणीचा महिलांना सल्ला
टीव्ही 9 मराठीशी बोलताना मधुराणीने एक कविता सादर केली. तुझी तू राहा ही संजीवनी बोकिल यांची एक कविता मधुराणीने सादर केली. यातून जगण्याचा एक मूलमंत्रच तिने दिला आहे. काहीही झालं तरी तू चालत राहा आमि तुझं ध्येय गाठत राहा, असंच मधुराणीने सांगितलं आहे.
मधुराणीच्या सुखाचं चांदणं काय?
मधुराणी प्रभुलकरची अरुंधती ही भूमिका सगळ्यांच्या पसंतीला उतरतेय. मधुराणी मूळची पुण्याची आह्. फण या मालिकेच्या शूटिंगसाठी ती मुंबईत राहाते. पण तिला सारखी तिच्या मुलीची आठवण येते. या मुलाखती दरम्यान आम्ही तिला तिच्या सुखाच्या चांदण्याविषयी विचारलं तेव्हा तिने “सध्या माझ्यासाठी माझ्या मुलीला भेटणं हेच माझ्या सुखाचं चांदणं आहे”, असं तिने सांगितलं.
संबंधित बातम्या