Maha Minister: कोण जिंकणार 11 लाखांची पैठणी; महामिनिस्टरचा महाअंतिम सोहळा
अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी त्यांच्या शहरात एक लाखाच्या पैठणीचा (Paithani) मान मिळवला.
महिला वर्गात लोकप्रिय असलेला झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम अठरा वर्षाहूनही जास्त काळ महाराष्ट्रातील, देशातील तमाम वहिनींचा सन्मान करत आला आहे. या कार्यक्रमाचं महामिनिस्टर (Maha Minister) हे पर्व तमाम वहिनींच्या भेटीस आलं आणि प्रचंड गाजलं. अकरा लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील दहा शहरांमध्ये चुरस रंगली. अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी त्यांच्या शहरात एक लाखाच्या पैठणीचा (Paithani) मान मिळवला आणि आता या दहा जणींमध्ये येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात अकरा लाखांच्या पैठणीसाठी जबरदस्त सामना रंगणार आहे.
या पर्वाच्या सुरुवातीपासून अकरा लाखांच्या पैठणीची चर्चा सर्वत्र सुरु होती. सोन्याची जर आणि हिरे जडवलेली ही पैठणी पाहण्याचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. कुठलं शहर या पैठणीचा मान पटकावणार? महाराष्ट्राच्या महापैठणीची मानकरी कोणती नगरी ठरणार? हे प्रेक्षकांना रविवारी महाअंतिम सोहळ्यात पाहायला मिळेल. या महाअंतिम सोहळ्यानंतर सोमवार 27 जूनपासून होम मिनिस्टरचा ‘खेळ सख्यांचा चारचौघींचा’ हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वात वहिनी त्यांच्या आवडत्या ग्रुप म्हणजेच महिला मंडळासोबत सहभागी होऊ शकतात.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram हे सुद्धा वाचा
11 लाखांच्या पैठणीवरून ट्रोल करणाऱ्यांना बांदेकरांचं उत्तर
11 लाखांच्या पैठणीवरून नेटकऱ्यांनी या कार्यक्रमाला ट्रोल केलं होतं. त्यावर उत्तर देताना आदेश बांदेकर म्हणाले होते, “जे 11 लाखांच्या पैठणीवरून मला किंवा वाहिनीला ट्रोल करत आहेत, त्यांना कदाचित माहिती नाही आहे की ती मी देणार नाही आहे. ती पैठणी प्रायोजकांकडून येते, झी मराठी या वाहिनीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आणि मी या कार्यक्रमाचा निवेदक आहे. हे समीकरण ज्यांना कळत नाही तिथेच त्या ट्रोलिंगकडे गांभीर्याने बघण्याचा विषय संपतो. तसंच 18 वर्षे सतत हा कार्यक्रम सुरु आहे म्हणजेच दररोज १ पैठणीच्या हिशोबाने जवळपास साडेपाच हजारापेक्षा जास्त पैठण्या या कार्यक्रमातून वहिनींना मिळाल्या आणि त्यामागे जो विचार आहे तो काहींना कळत नाही त्यामुळे हे ट्रोलिंग होतं. 11 लाखांची पैठणी ही येवलेमध्ये बनतेय आणि ही पैठणी बनवणारे कारागीर जे आहेत ते मूकबधीर आहेत. त्यामुळे पैठणीची किंमत 11 लाख असली तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळतोय. हा चांगला उद्देश अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नसेल त्यामुळे हे ट्रोलिंग होतंय. पण या पैठणीपेक्षा हे कारागिरांचा आणि वहिनींचा आनंद हा लाखमोलाचा आहे.”
महामिनिस्टर महाअंतिम सोहळा 26 जून रोजी रविवारी संध्याकाळी 7 वाजता आणि होम मिनिस्टर खेळ सख्यांचा चारचौघींचा 27 जून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.