Sameer Choughule | विनोदाच्या बादशहाला जेव्हा ‘सर्वोच्च ट्रॉफी’ मिळते! तुम्ही पाहिलीत का ‘ही’ कौतुकाची थाप?

अभिनेता समीर चौघुले यांना आजवरच्या प्रवासात एक खास आणि अनमोल अशी कौतुकाची थाप देणारी भेटवस्तू मिळाली आहे. स्वतः समीर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित याबाबतची माहिती दिली आहे.

Sameer Choughule | विनोदाच्या बादशहाला जेव्हा 'सर्वोच्च ट्रॉफी' मिळते! तुम्ही पाहिलीत का ‘ही’ कौतुकाची थाप?
Sameer Choughule
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 10:24 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) सध्या सर्वत्रच खूप गाजतोय. या कार्यक्रमाने यशाचं एक नवं शिखर गाठलं आहे. यातील लोकप्रिय अभिनेते समीर चौघुले (Sameer Choughule) यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी प्रेमाने त्यांना ‘विनोदाचा बादशहा’ अशी पदवी दिली आहे. आता या ‘विनोदाच्या बादशहा’ला एक खास कौतुकाची थाप मिळाली आहे.

अभिनेता समीर चौघुले यांना आजवरच्या प्रवासात एक खास आणि अनमोल अशी कौतुकाची थाप देणारी भेटवस्तू मिळाली आहे. स्वतः समीर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित याबाबतची माहिती दिली आहे.

काय आहे हे खास गिफ्ट?

समीर चौघुले यांना चक्क ‘स्वरसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. स्वतः लतादीदींनी एका कार्डवर समीर आणि महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टीमचे कौतुक करणारे शब्द लिहिले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी सोबत खास भेटवस्तू देखील पाठवली आहे.

पाहा पोस्ट :

‘निसर्ग किती ग्रेट आहे न !शब्द संपले की भावनांना वाट मिळावी म्हणून त्याने अश्रूंची निर्मिती केली…आज ते प्रकर्षाने जाणवलं…आज सुरांची आणि स्वरांची सरस्वती आदरणीय लता मंगेशकर दीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली. आणि ती ट्रॉफी म्हणजे दिदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद….थिजून जाणं म्हणजे काय ते आज मला कळलं..लतादीदी महाराष्ट्राची हास्यजत्रा नेहेमी बघतात आणि खूप हसतात….एन्जॉय करतात ही आम्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा कुटुंबियांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. हा सुवर्ण क्षण आयुष्यात आला तो फक्त आणि फक्त आमच्या हास्यजत्रा कुटुंबामुळे..मनःपूर्वक आभार सोनी मराठीचे हेड श्री. अजय भालवणकरसर, नॉन फिक्शन हेड अमित फाळकेसर, ईपी गणेश सागडे, सिद्धूगुरू जुवेकर. आणि आमचं विद्यापीठ सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे सर………ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे केवळ अशक्य होतं …आणि खास आभार माझी पार्टनर विशाखा सुभेदार..vishu आपल्या जोडीच्या यशात तुझा खूप मोठा वाटा आहे..तुझ्या शिवाय मी अपूर्ण आहे… Vishakha Subhedar thank you… आणि a big thank you to my Maharashtrachi hasyajatra family …अमीर हडकर आणि संपूर्ण बँड, दिग्दर्शन टीम, प्रोडक्शन टीम backstage चे सगळे कलाकार आणि Prasad Oak आणि @sai tamhankar thank you fir your support..आणि मयुरेश पई Mayuresh Satish Pai thank you thank you…..भरून पावलो ..आयुष्य सार्थकी लागलं’, अशी पोस्ट त्यांनी लिहिले आहे.

या भेटवस्तूमुळे समीर चौघुले यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये. ही खास भेटवस्तू, लतादीदींच्या हस्तलिखितातील पत्र यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

Janhvi Kapoor | परी म्हणू की सुंदरा… जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ!

Priya Bapat | ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी, दिन भी गुलाबी है गुलाबी ये कहर…’, प्रिया बापटच्या स्मायलिंग अंदाजावर खिळल्या नजरा!

RRR Movie | प्रदर्शनापूर्वीच RRR चित्रपटाचा नवा विक्रम! अमेरिकेतील बहुसंख्य मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.