‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणूक; सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

Majhi Tujhi Reshimgath: घडलेला प्रकार इतरांना कळावा आणि त्यांनी सजग राहावं, यासाठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणूक; सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ
Majhi Tujhi Reshimgath
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 5:43 PM

चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिजमध्ये काम देतो असं सांगून फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी समोर येत असतात. अशीच घटना ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या लोकप्रिय मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीसोबत घडली आहे. अभिनेत्री धनश्री भालेकरला (Dhanashri Bhalekar) वेब सीरिजमध्ये काम देतो असं सांगून त्यांच्याकडून 22 हजार 368 रुपये उकळण्यात आले आहेत. याप्रकरणी धनश्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेला प्रकार इतरांना कळावा आणि त्यांनी सजग राहावं, यासाठी धनश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. धनश्री गेल्या आठ वर्षांपासून अभिनयक्षेत्रात काम करत आहेत. तिने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. (Marathi Actress)

नेमकं काय घडलं? 8 डिसेंबर 2021 रोजी धनश्रीला नामांकित निर्मिती कंपनीच्या नावाने एक ई-मेल आला. मेल पाठविणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव अनिकेत असल्याचं सांगत तो दिग्दर्शक म्हणून काम करत असल्याचं भासवलं. एका वेब सीरिजमध्ये धनश्रीची निवड झाल्याचं त्या मेलमध्ये सांगण्यात आलं होतं. नामांकित कंपनी असल्याने धनश्रीनेही काम करण्यास होकार दिला. त्यानंतर अनिकेतने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून पुढील प्रक्रियेसाठी कार्यालयात बोलविण्यात येईल असं सांगितलं.

काही दिवसांनी अनिकेतने कोरोनाचं कारण देत शूटिंगच्या तारखा पुढे ढकलल्याचं धनश्रीला कळवलं. तसंच काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी हैदराबादमधील कार्यालयात जावं लागेल, असंदेखील सांगितलं. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी शीव नावाच्या एका व्यक्तीने धनश्रीला संपर्क केला. कंपनीचा कार्यकारी निर्माता असल्याचं त्याने सांगितलं. हैदराबादला कंपनीच्या कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी या, असं त्याने धनश्रीला सांगितलं. धनश्रीकडून विमानाच्या तिकिटाची नोंद होत नव्हती, म्हणून शीवने तिला एक क्रमांक दिला आणि त्या क्रमांकावर पैसे भरण्यास सांगितले. धनश्रीने विमान तिकिटाचे 22 हजार 368 रुपये त्या खात्यात जमा केले. मात्र त्यानंतर तिला तिकिट मिळालंच नाही.

घडलेल्या घटनेनंतर धनश्रीने अनेकदा शीव आणि अनिकेत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांकडून कोणतंच उत्तर आलं नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परीचा क्यूट अंदाज, गुलाबी ड्रेसमध्ये शेअर केले सुंदर फोटो

संबंधित बातम्या: “माझी तुझी रेशीमगाठ”मधून दहा वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुरागमन, आता नेहाच्या भूमिकेत जिंकतेय प्रेक्षकांचं मन

संबंधित बातम्या: तो बाहुला अन् ती बाहुली, जुळतील का दोघांच्या रेशीमगाठी? पाहा नव्या मालिकेचं नवं शीर्षक गीत

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.