मन झालं बाजींद: होळीच्या निमित्ताने कृष्णा-रायाची भरकटलेली गाडी येणार रुळावर
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका मन झालं बाजींद (Man Jhala Bajind) आता एका विलक्षण वळणावर आली आहे. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं की राया कृष्णाला सन्मानाने विधात्यांच्या घरी घेऊन जायचं वचन देतो आणि ते वचन पाळतो सुद्धा. पण आता मालिकेत खूप रंजक वळण येणार आहे.

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका मन झालं बाजींद (Man Jhala Bajind) आता एका विलक्षण वळणावर आली आहे. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं की राया कृष्णाला सन्मानाने विधात्यांच्या घरी घेऊन जायचं वचन देतो आणि ते वचन पाळतो सुद्धा. पण आता मालिकेत खूप रंजक वळण येणार आहे. गुरुजींनी सांगितलेल्या भाकीताचा धसका घेऊन राया कृष्णाला घराबाहेर काढणार आहे. भाऊसाहेब रायाला रोखून कृष्णाला सगळं खरं सांगायला सांगतात. पण राया काही न बोलता कृष्णाला खेचत मचाणाकडे घेऊन जातो आणि त्याला आग लावतो. तो रागाने कृष्णाला सांगतो आजपासून आपलं नातं संपलं. कृष्णा रडवेली होऊन आपल्या माहेरी येते. कृष्णाला आपल्यापासून दूर कसं ठेवावं हे न कळून शेवटी राया घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतो.
होळीच्या दिवशी राया घटस्फोटाचे पेपर कृष्णाला देतो. पण नियतीची खेळी मात्र वेगळीच असल्याने घटस्फोटाचे पेपर होळीमध्ये जळून राख होतात. त्यामुळे होळीच्या निमित्ताने कृष्णा आणि राया यांच्या भरकटलेल्या नात्याची गाडी रुळावर येईल असं दिसतंय. पण गुरुजीं सांगितलेलं भाकीत खरं ठरणार का? राया आणि कृष्णा एकत्र राहिले तर कृष्णाचा मृत्यू होणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
View this post on Instagram
या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेचं रंजक कथानक प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवतंय. गेल्या काही भागांत दाखवण्यात आलं की, कृष्णा चांगल्या मार्कांनी सी.ए.ची परीक्षा पास होते त्यामुळे तिचा गावात अगदी जल्लोषात सत्कार होतो. संपूर्ण गावात कृष्णाच्या यशाचा आनंद साजरा होतो. तिच्या पास होण्यामुळे रायाला देखील खूप आनंद होतो. पण कृष्णाला रायासोबत तिचं लग्न लावून तिला विधात्यांच्या घरी का आणलं याचं सत्य कळलं असल्यामुळे ती रायावर रागवून घर सोडून निघून जाते. त्यामुळे राया तिच्यासोबत हा आनंद साजरा करू शकत नाही. या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरात कृष्णाची भूमिका साकारतेय. तर अभिनेता वैभव चव्हाण हा रायाच्या भूमिकेत आहे.