Man Udu Udu Jhala: अखेर देशपांडे सरांनी इंद्राला दिली लग्नबंधनात अडकण्याची गोड शिक्षा; मालिकेत इंद्रा-दिपूची लगीनघाई

इंद्रा आणि दिपू यांची प्रेमकथा प्रेक्षकांना भावली. पण मालिकेत मात्र त्यांच्या प्रेमात अनेक अडथळे येताना दिसले आणि त्यांच्या प्रेमाला विरोधदेखील झाला. त्यामुळे दिपू आणि इंद्रा एकत्र कधी येणार प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

Man Udu Udu Jhala: अखेर देशपांडे सरांनी इंद्राला दिली लग्नबंधनात अडकण्याची गोड शिक्षा; मालिकेत इंद्रा-दिपूची लगीनघाई
Man Udu Udu Jhala: अखेर देशपांडे सरांनी इंद्राला दिली लग्नबंधनात अडकण्याची गोड शिक्षाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 8:55 AM

झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडु उडु झालं’ (Man Udu Udu Jhala) या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. इंद्रा आणि दिपू यांची प्रेमकथा प्रेक्षकांना भावली. पण मालिकेत मात्र त्यांच्या प्रेमात अनेक अडथळे येताना दिसले आणि त्यांच्या प्रेमाला विरोधदेखील झाला. त्यामुळे दिपू आणि इंद्रा एकत्र कधी येणार प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर इंद्रा आणि दिपू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. इंद्रा आणि दिपूच प्रेम देशपांडे सरांनी मान्य केलं आहे. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही दीपिकाची तर अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) हा इंद्राची भूमिका साकारतोय. या दोघांमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली असून सोशल मीडियावर या दोघांवर नेहमीच प्रेमाचा वर्षाव होत असतो.

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत इंद्रा आणि दीपिका यांचा कांदेपोह्यांचा कार्यक्रम पाहिला. ज्यामध्ये देशपांडे सर इंद्राला ‘जावई’ असं म्हणतात. या कांदेपोह्यांच्या कार्यक्रमात निळ्या साडीमध्ये दीपिकाचं सौंदर्य इतकं खुलून येत की इंद्राला तिच्यावरून नजर हटवणं कठीण होतं. देशपांडे सरांच्या परवानगीनंतर आता इंद्रा आणि दिपूच्या लग्नाचा बार उडणार आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा मालिकेचा प्रोमो-

हृता मालिका सोडणार नाही

मालिकेच्या निर्मात्यांशी हृताचे काही वाद झाले आणि त्यामुळेच ती मालिका सोडणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. मात्र खुद्द हृताने या चर्चांवर उत्तर दिलं आहे. ही मालिका सोडणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. “मी जेव्हापासून मालिकेत काम करायला सुरुवात केली, तेव्हापासूनच या चर्चांना उधाण आलंय आणि यामागचं कारण मला अजूनपर्यंत कळालेलं नाही. पण असं काहीच नाहीये. मी माझ्या लग्नासाठी अधिकृतरित्या रजा घेतली होती”, असं ती म्हणाली. हृताने नुकतीच दिग्दर्शक प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 15 दिवसांच्या सुट्ट्यांनंतर तिने पुन्हा शूटिंगला सुरुवात केली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.