Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Man Udu Udu Zhala: सानिकाचा हट्टीपणा दिपूच्या जीवावर बेतणार?

Man Udu Udu Zhala: या मालिकेच्या कथानकात सध्या सानिका आणि कार्तिक हे नकारात्मक भूमिकेत दिसत आहेत. सानिका आपल्या फायद्यासाठी गरोदर असल्याचं नाटक करते पण तिचं हेच खोटं आता सगळ्यांसमोर येणार आहे.

Man Udu Udu Zhala: सानिकाचा हट्टीपणा दिपूच्या जीवावर बेतणार?
Man Udu Udu ZhalaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 3:47 PM

‘मन उडु उडु झालं’ (Man Udu Udu Zhala) या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनवर खिळवून ठेवलं आहे. दिपू (Hruta Durgule) आणि इंद्राची (Ajinkya Raut) जोडी आणि त्यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडतेय. कथेत जर खलनायक असेल तर त्याची रंजकता अजूनच वाढते. या मालिकेच्या कथानकात सध्या सानिका आणि कार्तिक हे नकारात्मक भूमिकेत दिसत आहेत. सानिका आपल्या फायद्यासाठी गरोदर असल्याचं नाटक करते पण तिचं हेच खोटं आता सगळ्यांसमोर येणार आहे. मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की देशपांडे सरांच्या घरी असलेल्या पूजेला सानिका आणि कार्तिक येतात आणि सानिका पपई खाते. त्यामुळे तिला डॉक्टरकडे घेऊन जायची लगबग सुरु होतो.

सानिका डॉक्टरकडे जाण्यासाठी नकार देत असते पण तिचं न ऐकता दिपू तिला डॉक्टरकडे घेऊन जाते. डॉक्टरकडे गेल्यावर दिपूला कळतं की सानिका गरोदर नाही. पण ती घरी ही गोष्ट सांगत नाही. सानिकाची चोर ओटी भरत असताना तिला काही मोठं गिफ्ट माहेरून मिळालं नाही म्हणून ती तमाशा करते. तिचा तमाशा खूप वेळ सहन केल्यावर दिपू सगळ्यांना खरं काय आहे ते सांगते. सानिकाचा खोटारडेपणा आल्यावर तिच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल, हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

दुसरीकडे सानिकामुळे दिपूचा अपघात होणार असल्याचं मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. सानिकाला दिपू समजवायला जाते, मात्र दिपूलाच ती हात धरून घराबाहेर काढते. दिपूला धक्का दिल्यामुळे रस्त्यावरील एका गाडीची धडक तिला लागते आणि ती जमिनीवर कोसळते. या नव्या प्रोमोच्या कमेंट्समध्ये प्रेक्षकांनी सानिकावर राग व्यक्त केला आहे.

अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.